ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

छोट्याशा माशाने केली अवाढव्य मगरीची शिकार, फाडून फाडून खाल्लं


नवी दिल्ली, 14 जुलै : आतापर्यंत तुम्ही मगरीचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. सामान्यपणे मगरीला दुसऱ्या प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल. मगरीसमोर जंगलाचा राजा सिंह, वाघ, बिबट्या अशा खतरनाक प्राण्यांचंही काही चालत नाही.असताना एका छोट्याशा माशाने अवाढव्य मगरीची शिकार केली, असं म्हटलं तर साहजिकच त्यावर विश्वास बसणार नाही. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका छोट्याशा माशाने महाकाय अजगरीची शिकार केली आहे.

माशाने मगरीवर हल्ला केला. त्यात मगरीचा मृत्यू झाला. माशाने मगरीचे अक्षरशः दोन तुकडे केले. माशाने मगरीला फाडून फाडून खाल्लं.

अॅमेझॉनच्या जंगलातील हा शिकारीचा व्हिडीओ आहे. अशी शिकार कदाचित तुम्ही आजवर कधीच पाहिलीव्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक मगर पाण्यात उलटी पडलेली दिसते आहे. मगर मृत आहे.

तिच्या शेपटीकडील भागाजवळ एक मासा दिसतो आहे. जो मगरीच्या आत घुसला आहे. पाहता पाहता तो मगरीचं शरीर पोखरतो, शरीराच्या आत जातो आणि शरीराचे दोन तुकडे करतो. माशाने मगरीचं शरीर कापलं आहे.

आता ज्या मगरीसमोर भल्याभल्या प्राण्यांची शक्ती कमी पडते, तिचा छोट्याशा माशाने कसा काय जीव घेतला, असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. हा मासा साधासुधा नव्हे तर तो पिरान्हा मासा आहे. या माशाचे दात खूप तीक्ष्ण असतात. या दातांनी तो सर्वात मोठ्या प्राण्यांचं मांस कापून खातो.

मांसाहारी पिरान्हा मासे अतिशय धोकादायक असतात. त्यामुळे मोठे प्राणीही त्यांना घाबरतात.

रक्ताचा वास घेऊन तो हल्ला करतो. त्याचा स्वभाव अतिशय हिंसक आहे. हे मानवी हाड फक्त 30 सेकंदात चघळू शकते. एखाद्याला चावल्यास त्याचा मृत्यू होतो. हॉलिवूडमध्ये या माशावर बनलेले चित्रपट तुम्ही पाहिले असतीलच. त्याच्या हल्ल्याची बातमी भारतात अजून आलेली नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *