मनुष्याचे वय कमी होण्याची काय आहेत कारणे? गरुड पुराणात आहे या 5 गोष्टींचा उल्लेख
मुबई, 13 जुलै: गरुड पुराण हा सनातन हिंदू धर्माचा एकमेव धर्मग्रंथ आहे, ज्यामध्ये जन्म आणि मृत्यू तसेच मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन केले आहे. म्हणूनच ते सर्वोत्तम महापुराणांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींची माहिती असणेदेखील प्रत्येक व्यक्तीला महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये जन्म, मृत्यू, आत्मा, स्वर्ग, नरक, मरणोत्तर जन्म, पुनर्जन्म तसेच ज्ञान, विज्ञान, नीति, नियम, धर्म आणि कर्म इत्यादींबद्दलही सांगितले आहे. आज आपण पाहतो की प्रत्येक घरात एखादी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. अशी कोणतीही व्यक्ती नाही जी पूर्णपणे निरोगी आहे. एवढेच नाही तर आज माणूस अल्पायुषी होत चालला आहे. शेवटी, याचे कारण काय आहे, व्यक्तीचे वय का कमी होत आहे. गरुड पुराणात अशी 5 कारणे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे व्यक्तीचे वय कमी होते. सकाळी उशिरा उठणे आजकाल भौतिकवादी जगात माणसाची दिनचर्या खूप गोंधळलेली झाली आहे. खाण्यापिण्यापासून ते झोपेपर्यंतचा वेळही योग्य नसतो. लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि सकाळी उशिरा उठतात. गरुड पुराणानुसार जे लोक सकाळी उशिरा उठतात त्यांना सकाळी शुद्ध हवा मिळत नाही आणि अशा स्थितीत त्यांच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र चुकूनही रात्री दही सेवन करू नये. हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. गरुड पुराणानुसार रात्री दह्याचे सेवन केल्याने श्वसन आणि सर्दी या आजारांची शक्यता अनेक पटींनी वाढते. स्मशानभूमीचा धूर हानिकारक गरुड पुराणात असेही म्हटले आहे की, अंतिम संस्कार करताना मृत व्यक्तीचा धूर दूर ठेवावा. कारण मृतदेह जाळल्यानंतर जो धूर निघतो त्यात विषारी घटक असतात. जर एखादी व्यक्ती त्याच्या जवळ उभी राहिली तर धुरासोबत विषारी घटकही श्वासाद्वारे शरीरात पोहोचतात. शिळे मांस खाणे गरुड पुराणात सांगितले आहे की, जे शिळे मांस सेवन करतात त्यांचे वयही कमी होते. कारण शिळ्या किंवा अनेक दिवस जुन्या मांसामध्ये धोकादायक जिवाणू तयार होतात आणि ते खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही )