ताज्या बातम्या

निवृत्तीनाथ रावजी पाटील माहिती


निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३ – २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते.

मूळच्या येडेनिपाणी येथील सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर १९४४ मध्ये ते ठाणे येथे स्थायिक झाले.

भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता.

सावळाराम यांचे ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का’ हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्याऱ्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते.

पुरस्कार आणि सन्मान

  • पी. सावळाराम यांच्या कवितांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी बहाल केली होती.
  • पी.सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो.
    • २०१०साली हा पुरस्कार संगीतकार यशवंत देव यांना मिळाला होता
    • २०१२साली तो गायक सुरेश वाडकर यांना.
    • २०१३ साली सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांना


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *