देवेंद्रजी, जयंत पाटलांना घेऊन जा, पण परत आणून सोडा..”; पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून
मुंबई. शिवडी- नाव्हाशेवा पारबंदर प्रकल्प पाहण्यासाठी जयंतरावांना खुशाल घेऊन जा, पण परत आणून सोडा.. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्याने विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकच हशा पिकला आणि बैठकीतील वातावविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान मुंबईत घेण्याच्या निर्णयावर शुक्रवारी या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विधिमंडळाच्या कामकाजाबाबत चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाहत, ‘जयंतराव शिवडी- न्हावाशेवा पारबंदर प्रकल्प आता पूर्ण होतोय. तुम्हाला माझ्या गाडीतून या मार्गावरून घेऊन जाणार असे मी मागे सांगितले होते..’ त्यावर हो मला पण हा मार्ग पाहायचा आहे, असा होकार पाटील यांनी दिला.
‘जयंतरावांना खुशाल घेऊन जा पण परत आणून सोडा,’ अशी कोपरखळी अशोक चव्हाण यांनी मारली. त्यावरून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अशाच प्रकारे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्र्यांच्या टंचाईमुळे सभागृहात अनेक प्रश्नावर उत्तरे देण्यासाठी मंत्री उपस्थित नव्हते. यावेळी सुधारणा करा, अशी सूचना विरोधकांनी केली. त्यावर आता आमच्याकडे भरपूर मंत्री असून काहीही विचारा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
विधिमंडळ वाटचालीचे दस्ताऐवजीकरण
विधिमंडळाच्या शतकोतर प्रवासाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ वाटचालीचे दस्ताऐवजीकरण करण्याचे फडणवीस यांनी यावेळी सूचित केले. विधिमंडळाचा गौरवशाली इतिहास संदर्भग्रंथाच्या माध्यमातून जतन करण्याचे तसेच विविध परिसंवादाद्वारे विधिमंडळाच्या आजपर्यंतच्या कामकाजातून महत्त्वपूर्ण घटना, प्रसंगांना उजाळा देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्याची सूचना गोऱ्हे यांनी मांडली. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात सादर करण्याबाबत मांडलेल्या सूचनेवर अध्यक्ष अॅड. नार्वेकर यांनी यावेळी संमती दर्शवत ठराव मांडण्याचा निर्णय घेतला.रणही काहीसे निवळले.