ताज्या बातम्या

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती


आपल्या भारत देशाला अनेक समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे देखील थोर समाजसुधारक आणि विचारवंत होते. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा फुले या नावाने देखील ओळखले जाते. महात्मा ज्योतिराव फुले हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जाती विरोधी समाज सुधारक आणि महाराष्ट्रातील एक लेखक होते.

समाज कार्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, जातीव्यवस्था आणि महिलांसाठी शिक्षण अशी आणिक समाजसुधारणेचे कार्य पार पाडली.

महात्मा फुले यांचा जन्म आणि बालपण :

महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 17 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. पुढे ज्योतिबा फुले आणि त्यांचा संपूर्ण परिवार कुटगुणहून पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे स्थलांतरित झाला.

महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ नऊ महिन्याच होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. महात्मा ज्योतीबा फुले हे अवघ्या तेरा वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावीच झाले. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ भाजी विक्रेत्या चे काम केले.

त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. महात्मा ज्योतिराव फुले हे अभ्यासामध्ये खूप हुशार असल्याने त्यांनी पाच ते सहा वर्षांमध्ये संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मनामध्ये वडीलधार्‍या माणसांन बद्दल आणि गुरुजनांन बद्दल नेहमी आदर होता. ग्रामची या प्रसिद्ध तत्वज्ञाने महात्मा ज्योतिराव फुले यांना “सेंद्रिय बुद्धिवंत” असे संबोधले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शाळेमध्ये त्यांचा सर्व अभ्यास मन लावून करात. म्हणून त्यांना शाळेमध्ये नेहमी प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त होत होते. शाळेची शिस्त प्रिय, हुशार आणि बुद्धिमान व आज्ञाकारी विद्यार्थ्यांचा सन्मान महात्मा ज्योतिराव फुले यांनी मिळविला होता.

महात्मा फुले त्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण करत होते तेव्हा पुण्या मध्ये बरेच फकीर पंत येत होते. चांगले लिहायला व वाचायला येत असणाऱ्या ज्योतिबा फुले यांच्याकडून हे कबीर पंथ नेहमी ” बीज मती” हा ग्रंथ वाचून घेत होते. या ग्रंथातील ज्ञानामुळे महात्मा फुले यांच्या मनावर कबीर यांच्या शिकवणीची बीज ही चांगलीच रुजली होती. महात्मा फुले यांना तर या ग्रंथातील अनेक कबीरांचे दोहे देखील पाठ झाले होते.

महात्मा फुले यांचे कार्य :

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजप्रबोधनासाठी आणि समाज कार्यासाठी काय महत्वाचे योगदान दिले. त्यांनी केलेली आपल्या समाजासाठी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि महिलांसाठी शिक्षण व्यवस्था सुरू करण्यासाठी केलेली कार्य पुढीलप्रमाणे;

शैक्षणिक कार्य :

शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल आणि महत्वाचे कार्य करण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा खूपच महत्त्वाचा भाग आहे. महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या काही महत्त्वाच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.

विद्येविना मती गेली |

मतीविना नीती गेली |

नीतीविना गती गेली |

गतीविना वित्त गेले |

वित्ताविना शूद्र खचले |

इतके अनर्थ एका अविद्येने केले |

बहुजन समाजातील अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवीसन 1848 साली पुणे येथील भिडे यांच्या वाड्यामध्ये महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा काढली यापूर्वी मुलींना शिक्षणाचा हक्क दिला जात नव्हता. त्यांनी मुलींच्या शाळेची जबाबदारी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांच्यावर स्वप्नाली त्यांनी प्रथमता सावित्रीबाई यांना शिक्षण दिले व त्यांना शिक्षिका म्हणून मुलींच्या शाळेमध्ये काम करण्यास सुरुवात केली यानंतर ज्योतिराव आणि अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *