ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

सोलापूर : कृषी योजनांची माहिती मिळणार एका क्लिकवर


सोलापूर : शेतकर्‍यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देऊन त्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या वतीने केला जात आहे. याच अनुषंगाने या वर्षात सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी विभाग जिल्हा परिषदेच्या व शासनाकडील योजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने सर्वंकष माहिती अंतर्भूत असलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे.

क्यू आर कोड माध्यमातून अर्ज व माहिती उपलब्ध करून देण्याचे काम कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आलेला आहे. यामुळे शेतकर्‍यांना अत्यंत सुलभरीत्या याचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

कृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, उपविभागीय कृषी अधिकारी जयंत कवडे, प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, डॉ. शरद जाधव यांनी, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, श्रीमती मनीषा मिसाळ, मोहीम अधिकारी नंदकुमार पाचकुडवे हे उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी विभाग जिल्हा परिषदेच्या व शासनाकडील योजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने सर्वकंष माहिती अंतर्भूत असलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे. क्यू आर कोड माध्यमातून अर्ज व माहिती उपलब्ध करून देण्याचे काम कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आलेला आहे. यामुळे शेतकर्‍यांना अत्यंत सुलभ रीत्या याचा लाभ होणार आहे. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कृषी विभाग यांत्रिकीरणाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे उन्नती करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे हे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन विहीर योजनेचे कार्यारंभ आदेश वितरण, विहीर पूर्णत्वाचा दाखला, विहीरपूरक साहित्याचे आदेशाचे वितरण, जिल्हा परिषदचे फॉर्म माहिती पुस्तिकेसह वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे कृषी विभागाकडील सर्व योजनांचे क्यू आर कोड पोस्टर्स जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व पंचायत समिती यांना दिलीप स्वामी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *