नवी दिल्ली – संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाअंतर्गत पुनर्वसन महासंचालनालयाने माजी सैनिकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी ‘आयबीएम’सह एक सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराद्वारे, ‘आयबीएम’ कंपनीत निर्माण होणाऱ्या संबंधित नोकरीच्या संधींसाठी माजी सैनिकांचा उपयोग करण्याकरता समन्वय राखला जाणार आहे.
कॉर्पोरेट विश्वात कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात मदत करेल आणि माजी सैनिकांना सन्माननीय दुसरे करिअर मिळवून देईल, असे पुनर्वसन महासंचालक मेजर जनरल शरद कपूर यावेळी म्हणाले.
विशेष म्हणजे एप्रिल 2022 ते मार्च 2023 या एका वर्षात 24,234 माजी सैनिकांना विविध क्षेत्रात लाभदायक रोजगार मिळाला आहे. सशस्त्र दलांमधे तरुणांचे प्रमाण राखण्यासाठी, दरवर्षी अंदाजे 60,000 कर्मचारी तुलनेने तरुण वयाताच सेवानिवृत्त केले जातात.
दुसऱ्या करिअरद्वारे त्यांचे पुनर्वसन सुलभ करण्यासाठी, कॉर्पोरेट आणि उद्योग जगताच्या गरजांवर जोर देऊन अतिरिक्त कौशल्ये आत्मसात करण्यासाठी माजी सैनिकांना डीजीआर मदत करते.