घटनेत दुरुस्ती करून मराठ्यांना आरक्षण द्या;अखिल भारतीय मराठा महासंघाची भूमिका
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन काम केले. त्यांचा आदर्श पुढे घेऊन चालले पाहिजे. आणि त्या मुळेच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेणे हे योग्य नाही.
कारण त्या २७ टक्के आरक्षणमध्ये ऑलरेडी ३६६ जाती आहेत. व त्यातून फारसे काही साद्य होणार नाही.व त्यामुळे दोन समाजामध्ये दरी निर्माण केल्या पेक्षा घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी २५ जुलै रोजी जंतर मंतर, दिल्ली येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी आज पुणे येथे शनिवार २४ जून रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित मराठा आरक्षण या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेला मार्गदर्शक वक्ते म्हणून मराठा आरक्षणा या विषयातील तज्ज्ञ व ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते – पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना त्यांनी सर्व उपस्थितांना सर्व कायदेशीर बाबी समजाऊन सांगितल्या.व मराठ्यांना आरक्षण हे घटनेत दुरुस्ती करूनच मिळू शकते. असे त्यांनी स्पष्ट केले.व त्यावर सर्व उपस्थितांनी सहमती दर्शवली.या कार्यशाळेला महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, कोषाध्यक्ष श्रीरंग बरगे, विभागीय चिटणीस दशरथ पिसाळ,महासंघाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष रणजित जगताप, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली दहातोंडे, मराठा क्रांती मोर्चाचे संभाजीनगरचे समन्वयक रवींद्र काळे पाटील, अजय पाटील, संजय पासलकर, राजेंद्र मयूर गुजर , राजेंद्र जाधव, आरती मारणे, उदयसिंह पाटील, दिलीप धंद्रे, राम मुळे, धोंडू जाधव, सुभाष झांबड , करनसिंह मोहितेहंबीरराव, राजेंद्र गवांदे, शाम पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.