ताज्या बातम्यामहत्वाचे

“राज्याच्या अन्नभाग्य योजनेत राजकारण नको


बंगळूर: राज्यात काँग्रेस सरकारने जाहीर केलेली महत्त्वाकांक्षी अन्नभाग्य योजनेत केंद्र सरकारने राजकारण करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केली.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.

खुल्या बाजारातून तांदूळ खरेदी करण्यास सरकारने पुढाकार घेतला आहे. अन्नभाग्य योजनेसंदर्भात अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. भारत अन्न पुरवठा विभागाला तांदूळ पुरवठा करण्याबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून लवकरच कळवणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले आहे. गोरगरिबांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय आपण करत असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारने राज्यासाठी दोन आयआरपी बटालियन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याची केंद्राने लवकरच अंमलबजावणी करावी, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची भेट घेऊन अतिरिक्त तांदूळ पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा केली. मात्र, सदर भेट अयशस्वी ठरली. त्यामुळे त्यांनी अन्न विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळू. विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत आहे. तांदूळ पुरवठ्यासाठी आपले सरकार इतर राज्याकडून प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने सहकार्य न केल्यास पुढे पर्याय काय, असा प्रश्न विचारताच, मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा करण्यात येत आहे. लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *