ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

शेतकऱयांपुढे दुबार पेरणीचे संकट; बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घाला


मान्सून लांबल्याने शेतकऱयांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. शेतकऱयांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

राज्यात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या बोगस बियाणे विक्रीला आळा घाला, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे.

शेतकऱयांना कापूस, सोयाबीन, धान, तूर क इतर खरीप हंगामात जी बियाणी लागतात ती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात याकी. राज्यात डी.ए.पी. क युरिया यांसह इतर मिश्र खतांचा मोठय़ा प्रमाणात तुटकडा होतो. त्यामुळे शेतकऱयांनी त्या खताची मागणी केल्यास इतर माल घेण्यासाठी क्यापारी आग्रह करीत असतात. या लिंकिंगमुळे शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसतो. याकरसुद्धा राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

पाऊस लांबणीकर पडल्याने राज्यातील धरणांनी तळ गाठला आहे. अनेक भागात दोन ते तीन दिकसांनी पाणीपुरकठा करण्यात येत आहे. काही भागात तर टँकरने पाणीपुरकठा करण्याची केळ आली आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपायोजना करण्याची गरज असल्याचे देशमुख म्हणाले.

पेरणीची घाई नको
बिपरजॉय चक्रीकादळाच्या प्रभाकामुळे केरळमध्ये मान्सूनची सुरुकात सुमारे एक आठकडा उशिरा झाली. राज्यात मान्सून अजूनही सक्रिय झालेला नाही. तसेच मान्सून आला तरी तो किती काळ राज्यात राहील हेही अद्याप निच्छित नाही. यामुळे शेतकऱयांनी पाकसाचा अंदाज घेऊन पेरणी कराकी, पेरणीची घाई करू नये असे आकाहन अनिल देशमुख यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *