संभाजीनगरमधून महाराष्ट्राला मिळणार नवा CM? कुणी केला सर्व्हे?
महाराष्ट्राच्या राजकारणात आता राजकीय सर्व्हेवरुन राडा सुरू आहे. महाविकास आघाडीनंतर एकना शिंदे यांच्या शिवसेनेने देखली एका सर्व्हेच्या दोन वेळा वर्तमान पत्रामध्ये पानभर जाहिराती दिल्या.
त्यामुळे विरोधख आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार राजकारण सुरु आहे. दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
दोन्ही सर्व्हेवरुन इम्तियाज जलील यांनी मिश्किल टोलेबाजी केली आहे. मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, असी इच्छा का असू नये असे जलील यांनी स्पष्ट केले आहे. मी केलेल्या सर्व्हेमध्ये मीच एक नंबरचा मुख्यमंत्री आहे, असा टोला जलील यांनी लगावला आहे.
आम्ही जो सर्व्हे केला आहे त्यामुळे इम्तियाज जलील महाराष्ट्रातील सर्वात चांगला मुख्यमंत्री होऊ शकतो. मला माहीत नाही बाकीच्या सर्व्हेमध्ये काय आलं. सर्व लोकांनी आपआपल्या रीतीने सर्व्हे केला, असे जलील म्हणाले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जाण्याची तुमची इच्छा आहे का? यावर जलील म्हणाले, का नाही हे जे सगळे बसले आहेत. त्यांचे त्यांच्यापेक्षा ५० टक्के चांगला मुख्यमंत्री इम्तियाज जलील होऊ शकतो.