ताज्या बातम्याधार्मिकमहत्वाचे

पंचवटीत आज जगन्नाथ रथ यात्रा; वाहतूक पोलीस शाखेने केले मार्गात बदल


पंचवटी परिसरातून उद्या (ता. २०) सकाळी जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील रथयात्रा पंचवटी व भद्रकाली हद्दीतून मार्गस्थ होणार असल्याने या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

त्यामुळे मंगळवारी (ता. २०) सकाळी रथयात्रा संपेपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले आहे.

जगन्नाथ रथयात्रेला मंगळवारी (ता. २०) सकाळी १० वाजता पंचमुखी हनुमान मंदिरापासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर रथयात्रा काट्या मारुती चौक, गणेशवाडी, देवी चौक, मुंजोबा चौक, आयुर्वेदिक दवाखाना, गाडगे महाराज पुल, दिल्ली दरवाजा, नेहरु चौक धुमाळ पॉईंट, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पुल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, शिवाजी चौक, काळाराम मंदिर पूर्व व उत्तर दरवाजासमोरून, ढिकले बंगला, नाग चौक, लक्ष्मण झुला पुल, काट्या मारूती चौक, पंचमुखी हनुमान मंदिर येथे यात्रेचा समारोप होईल.

या रथयात्रेनिमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे रथयात्रा मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

त्या अनुषंगाने रथयात्रा मार्गावरील वाहतूक मार्ग सकाळी ९ ते रथयात्रा संपेपर्यंत सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर काही मार्गांवरील वाहतूक अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याची अधिसूचना वाहतूक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी जारी केली आहे.

वाहतूकीसाठी प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग

* शिवाजी चौक – सितागुंफा रोडकडून येणारी वाहतूक बंद

* मालेगाव स्टॅण्ड

* रोकडोबा तालीम – बॅरिकेटिंग पॉईंट

* मालविय चौक – काळाराम मंदिराकडे येणारी वाहतूक बंद

* गणेशवाडी कॉर्नर देवी चौक खुट मंदिराजवळ – बॅरिकटिंग पॉईंट

* संतोष टी पॉईंट – निमाणी, काट्या मारुती पोलीस चौकीकडे जाणारी वाहतूक बंद

* काट्या मारुती पोलीस चौकी – काळाराम मंदिराकडे येणारी वाहतूक बंद

* गणेशवाडी देवी मंदिर

* नेहरु चौक, दहिपुल प्रकाश सुपारी, धुमाळ पॉईंट, मंगेश मिठाई, रविवारी कारंजा – या सर्वठिकाणी बॅरिकेटिंग पॉईंट

वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग

* काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडी मार्गे मेनरोडकडे जाणारी वाहने काट्या मारुती – संतोष टी पॉईंट – द्वारका – शालिमार मार्गे इतरत्र जातील

* दिंडोरी नाका ते होळकर पुलाकडे जाणारी वाहने – मखमलाबाद नाका, रामवाडी पुल मार्गे इतरत्र जातील

* संतोष टी पॉईंटकडून दिंडोरी नाक्याकडे जाणारी वाहने एकेरी मार्गाने जातील.

* बुधा हलवाई – बादशाही कॉर्नर मार्गे इतरत्र

* बादशाही कॉर्नर – गाडगे महाराज पुतळा – नेपाळी कॉर्नर, शालिमार मार्गे इतरत्र जातील

* सांगली बँक सिग्नल – नेहरू गार्डन – नेपाली कॉर्नर, शालिमार मार्गे इतरत्र जातील

* रामवाडी पुलावरून अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सांगली बँक सिग्नल – शालिमार – गंगापूर रोड – सीबीएसमार्गे इतरत्र जातील


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *