सरकारी कर्मचाऱ्यांनो! पुढील महिन्यात एक दिवसाचा पगार कमी मिळेल, कारण वाचून घ्या.
तुम्हीही राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. ती म्हणजेच राज्य शासनाने राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्यातील सर्व भारतीय प्रशासन सेवेतील तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
जून महिन्याच्या पगारातून ही कपात होणार असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाणार आहे.
शेतकऱ्यांना गेल्या अनेक दशकांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातदेखील कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आता राज्यातील पुनर्वसनाच्या कार्याला हातभार म्हणून भारतीय प्रशासन सेवा, भारतीय पोलिस सेवा, राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचाचारी यांच्या जून महिन्यातील वेतनातून प्रत्येकी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगी म्हणून कापले जाणार आहे.
नुकताच या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय सेवेतील सर्व संवर्गातील विभागप्रमुख कार्यालयांना आदेश देखील देण्यात आले आहेत. विभागप्रमुखांना कर्मचाऱ्यांकडून यासाठीच्या अनुमती पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी निश्चितच हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे.