मोफत रेशन योजना बंद होणार? केंद्र सरकारकडून स्वस्त गहू-तांदूळ विक्रीवर बंदी
केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, केंद्र सरकारने मोफत रेशन योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यांना मिळणारा गहू आणि तांदूळ बंद होणार असून मोफत रेशन बंद होण्याची शक्यता आहे.
सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत राज्यांना पुरवण्यात येणाऱ्या गहू आणि तांदूळाची विक्री थांबवण्यात आली आहे. कर्नाटकसह देशातील काही राज्यांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय अन्न महामंडळाने (FCI) जारी केलेल्या आदेशानसार राज्य सरकारांना ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री बंद करण्यात आली आहे.
छगन भुजबळांचे राज्य सरकारला साकडं; सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत केली मोठी मागणी
कर्नाटकने या योजने अंतर्गत जुलै महिन्यासाठी तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दराने 13,819 टन तांदळाची मागणी केली होती. पण कर्नाटक ला आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पण दुसरीकडे OMSS अंतर्गत, ईशान्येकडील राज्यांना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या राज्यांसाठी 3,400 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री सुरू राहणार असल्याचे केंद्र सरकारने म्हंटले आहे.
बाजारातील किमती कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार भारतीय अन्न महामंडळ ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत खाजगी व्यापाऱ्यांना केंद्रीय पूल स्टॉकमधून तांदूळाची विक्री करणार आहे. 12 जूनला केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत गव्हावर स्टॉक मर्यादा लागू करताना खुल्या बाजारातील किंमत कमी करण्यासाठी तांदूळ गव्हाची विक्री करण्याची घोषणा केली होती.