ताज्या बातम्या

‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट गोवा सर्वांत अगोदर गाठणार ! – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा


पणजी, १५ जून (वार्ता.) – ‘विकसित भारत : २०४७’चे उद्दिष्ट गोवा सरकार सर्वांत अगोदर गाठणार आहे, असा विश्‍वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, ”विधानसभांचे कामकाज अल्प दिवस चालणे, ही चिंतेची गोष्ट आहे; मात्र गोव्यात वर्षाकाठी विधानसभेचे ४० दिवस कामकाज होते, ही चांगली गोष्ट आहे.” लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे १५ जून या दिवशी गोव्यात एक दिवसाच्या भेटीवर आले होते. या वेळी त्यांनी विधानसभा सभागृहात आजी-माजी आमदार, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य यांना ‘विकसित भारत २०४७ : लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर संबोधित केले. या वेळी व्यासपिठावर विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. ओम बिर्ला यांच्या भाषणावर विरोधी पक्षांतील सातही आमदारांनी बहिष्कार घातला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला पुढे म्हणाले,

”जनतेच्या कल्याणासाठी कायदे बनवतांना विधानसभेत व्यापक चर्चा व्हायला पाहिजे. सध्या विधानसभेच्या कामकाजाचे दिवस घटत चालले आहेत आणि हे योग्य नव्हे. विधानसभेत जेवढी अधिक चर्चा होईल, तेवढे चांगले कायदे सिद्ध होणार आहेत. लोकप्रतिनिधींनी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करून जनतेशी संवाद वाढवला पाहिजे. गोवा हे लहान राज्य असले, तरी जनतेच्या अपेक्षा अधिक असू शकतात. यामध्ये प्राथमिकता निवडून आपण पुढे जायला पाहिजे.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *