ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

Chain Pulling च्या प्रकरणात 3 लाखांचा दंड; RPF पथकाची गुन्हेगारांवर कडक कारवाई


रेल्वेतील अनअधिकृत फेरीवाल्यांसाठी चैन पुलींग करणाऱ्या भामट्यांकडून एकाच महिन्यात रेल्वेने तब्बल तीन लाखांचा दंड वसूल केला आहे. त्यासोबतच अनअधिकृत दलालांकडून अवैध तिकीटावर प्रवास करणाऱ्यांवरही कारवाई केली आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने मे महिन्यात भुसावळ विभागात फुकटे प्रवासी, बोगस तिकीटावरील प्रवासी, अनअधिकृत वेंडरर्स, मद्य व तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. (

गुन्हे दाखल करून भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये अनधिकृत अलार्म चैन ओढण्याची ९४१ प्रकरणांची नोंद करण्यात आली. ७११ व्यक्तींना अटक करण्यात आली आणि २ लाख ७१ हजार २०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

बोगस तिकीटावर प्रवास

भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये, बेकायदेशीर बोगस तिकटांवर प्रवास करण्याची ४९ प्रकरणे नोंद झाली. ५२ दलालांवर कारवाई करण्यात आली. कायद्याच्या कलम १४४ (१) अंतर्गत अनधिकृत फेरीवाल्यांची २,७४१ प्रकरणे नोंदविण्यात आली. २,७२९ अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करून १७ लाख २७ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मद्य-गुटखा तस्करी

रेल्वेतून अवैध दारूच्या १ लक्ष १९ हजार ६८० रुपयांच्या ३६३ बाटल्या जप्त करून चौघांना अटक करण्यात आली. ६४ किलो वजनाची आणि ८४ हजार रुपयांची अवैध तंबाखू उत्पादनांची १४ पाकिटे जप्त करण्यात आली.

प्रवाशांना आवाहन

इतरांना गैरसोय होण्याच्या अनावश्यक कारणांसाठी विनाकारण साखळी ओढू नका. अनधिकृत एजंट, दलालांकडून तिकिटे खरेदी करू नका. अनधिकृत फेरीवाल्यांना प्रोत्साहन देऊ नका. ट्रेनमध्ये दारू, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाऊ नका. योग्य तिकीट मिळवा आणि सन्मानाने प्रवास करा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *