आरोग्यताज्या बातम्या

बडीशेप खा आणि झटपट वजन घटवा


वजन वाढण्याचा वेग जेवढा जास्त असतो त्या तुलनेत वजन कमी होण्याचा फार कमी असतो. अनेकांना घर आणि नोकरी-व्यवसायाचा व्याप यामुळे व्यायामासाठी पुरेसा वेळ काढणे शक्य होत नाही.

वजन वाढत राहते आणि ही समस्या कशी सोडवावी हा प्रश्न गंभीर होत जातो. पण आता या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. बडीशेप व्यवस्थित चावून खाल्ली तर वजन कमी करणे शक्य आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण हे तज्ज्ञांनी तपासून आणि खात्री करून सांगितलेले सत्य आहे.

रात्री एका छोट्या वाटीत पिण्याचे पाणी घ्या. या पाण्यात एक किंवा दोन चमचे बडीशेप टाका. आता ही वाटी झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या वाटीतले पाणी प्या. वाटीतली बडीशेप चावून खा. या प्रयोगासाठी भाजलेली बडीशेप वापरली तर जास्त फायदा होईल. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. बडीशेप खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार बरे होण्यास मदत होते. तसेच शरीरातील विषद्रव्ये वेगाने आणि नैसर्गिकरित्या बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे ताजेतवाने वाटते. उत्साह वाढतो.

बडीशेपचा चहा : सकाळी चहा किंवा कॉफी किंवा दूध असे काही पिण्याची सवय असेल तर आता त्याऐवजी हा बडीशेपचा चहा पिऊन बघा. यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढेल. हा प्रयोग करण्यासाठी आधी एक कप किंवा एक ग्लास पाणी सहन होईल, पिता येईल एवढेच गरम करा. यानंतर त्या पाण्यात एक चमचा बडीशेप टाकून व्यवस्थित ढवळा. आता हे गरम पाणी प्या आणि पाण्यातली बडीशेप व्यवस्थित चावून खा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल तसेच शरीरातील विषद्रव्ये नैसर्गिकरित्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगाने होईल. या प्रयोगासाठी भाजलेली बडीशेप वापरली तर जास्त फायदा होईल.

बडीशेपची पूड : एक मूठभर भाजलेली बडीशेप कुटा आणि तिची बारीक पूड करा. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी आणि एक चमचा बडीशेपची पूड यांचे सेवन करा. आपण इच्छा असल्यास बडीशेपच्या पूडमध्ये मेथीदाणे, काळे मीठ, हिंग आणि खडीसाखर घालू शकता. बडीशेपची पूड खाल्ल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन होणे तसेच पोटाशी संबंधित विकार बरे होणे यासाठी मदत होते. वजन कमी होण्यासही मदत होते.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी भाजलेली बडीशेप खाणे लाभदायी आहे. प्रत्येकवेळी जेवण झाल्यानंतर थोडी भाजलेली बडीशेप चावून खाण्याची सवय लावून घ्या. बडीशेप खाण्याची सवय असेल तर आपण धूम्रपान, मावा, गुटखा, पान खाणे, सुपारी चघळणे, अशा स्वरुपाची व्यसनांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकाल. बडीशेप खाण्याने तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. तोंडाला सुगंध येईल. अन्न पचण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

बदाम, शेंगदाणे आणि भाजलेली बडीशेप यांच्या मदतीने घरच्या घरी काही स्नॅक बार तयार करू शकता. हे स्नॅक बार खाल्ल्याने शरीराला प्रोटिन्स मिळतील आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

बडीशेप खाण्याचे फायदे

बडीशेप खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.काही वेळा चष्मा जातो अथवा चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.
बडीशेप खाल्ल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
बडीशेप खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
बडीशेप खाल्ल्याने शरीरातील विषद्रव्ये नैसर्गिकरित्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगाने होण्यास मदत होते.
बडीशेप खाल्ल्याने रक्तशुद्ध होते.
बडीशेप खाल्ल्याने स्तनदा मातांच्या स्तनात चांगल्या दुधाची निर्मिती होते, याचा बाळाला फायदा होतो.
बडिशेप खाल्ल्याने तोंडाला सुंगध येतो आणि श्वसनमार्गातील अडथळे दूर होतात.
अस्थमा, दमा, सायनस हे त्रास कमी होण्यास बडीशेप खाण्याने मदत होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *