ओदिशातील बालासोर इथे काल (2 जून) रात्री झालेल्या एका मोठ्या रेल्वे अपघातात 207 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, अपघातानंतर या मार्गावरील काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून या गाड्यांची यादी जारी करण्यात आली आहे.
वळवलेल्या गाड्यांची यादी
ट्रेन क्रमांक – 22807 जी टाटा जमशेदपूर मार्गे जाईल.
ट्रेन क्रमांक- 22873 देखील टाटा जमशेदपूर मार्गे जाईल.
ट्रेन क्रमांक- 18409 देखील टाटा जमशेदपूरच्या दिशेने वळवण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक- 22817 टाटा जमशेदपूरच्या दिशेने वळवण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 15929 ही गाडी भद्रकला परत बोलावण्यात आली आहे.
12840 चेन्नई सेंट्रल – हावडा सध्या खरगपूर विभागातील जरोली मार्गे धावेल.
18048 वास्को द गामा – शालीमार कटक, साळगाव, अंगुल मार्गे वळवली जाईल.
22850 सिकंदराबाद-शालीमार साप्ताहिक ट्रेन कटक, साळगाव, अंगुल मार्गे वळवल्या जातील.
रद्द केलेल्या गाड्यांची यादी
ट्रेन क्रमांक 12837 हावडा पुरी सुपर फास्ट एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 12863 हावडा-एसएमव्ही बंगळुरु एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय, ट्रेन क्रमांक 12839 हावडा-चेन्नई सेंट्रल मेल, गाडी क्रमांक 12895, 20831 आणि 02837 देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
मृतांचा आकडा वाढला, 233 जणांचा मृत्यू
राज्याचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी हा अपघात झाला. आधी हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांवर आदळली आणि नंतर कोरोमंडल एक्स्प्रेस मागून येऊन धडकली आली, त्यामुळे अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघातातील मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत 233 जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे,