ताज्या बातम्यामहत्वाचे

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्कराच्या मुख्यालयात जनता घुसली, आयएसआयच्या मुख्यालयावर हल्ला..


पाकिस्तान : पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान आज मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्संनी अटक केली.

इस्लामाबाद उच्च न्यायालयात उपस्थित असताना त्यांना पाकिस्तानी रेंजर्संनी ताब्यात घेतले. त्यानंतर देशातील राजकीय परिस्थीती वेगाने बदलली. इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर येण्याचे आवाहन केले.

दरम्यान, पाकिस्तानच्या (Pakistan) इतिहासात कदाचित पहिल्यांदाच लष्कराच्या मुख्यालयात जनता घुसली असेल. याशिवाय आयएसआयच्या मुख्यालयावरही हल्ला करण्यात आला.

जनतेसोबतच्या युद्धात पाकिस्तानी लष्कर पूर्णपणे बॅकफूटवर दिसत आहे. दरम्यान गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अशा परिस्थितीत पाकिस्तानची अवस्था श्रीलंकेसारखी तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. श्रीलंकेत संतप्त लोक राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसले होते.

इम्रान खान यांना अटक करुन शाहबाज सरकारकडून चूक झाली आहे, असे वाटते? तर दुसरीकडे, शाहबाज सरकारमधील मंत्र्यांनी इम्रान यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला.

मात्र देशात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ते पाहता शाहबाज सरकार अडचणीत सापडले आहे. इम्रान यांच्या अटकेमुळे जनता एवढी भडकेल याची बहुधा सरकार आणि लष्कराला कल्पना नसावी.

खान यांच्या अटकेची बातमी येताच पाकिस्तानातील अनेक प्रमुख शहरांमध्ये निदर्शने सुरु झाली. अनेक ठिकाणी आंदोलक हिंसक झाले. त्यांनी पोलिसांच्या वाहनांना आग लावली आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले.

पाकिस्तानात अलीकडे काही ठीक नाही. आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान विविध देशांकडून मदत मागत आहे.

तर दुसरीकडे, कर्जाबाबतची त्यांची विनंतीही आयएमएफकडे प्रलंबित आहे. सध्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याआधीच त्यांच्यासमोर नवे राजकीय संकट उभे राहिले आहे. इम्रान खान यांची अटक अशा वेळी झाली आहे, जेव्हा पाकिस्तान सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी निमलष्करी दलाने अटक केली, जेव्हा ते एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुनावणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात उपस्थित होते.

एक दिवसापूर्वी खान यांनी देशाच्या लष्करावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या ज्येष्ठ नेत्या शिरीन मजारी यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे अध्यक्ष खान, जे लाहोरहून इस्लामाबादला आले होते, त्यांची कोर्टात बायोमेट्रिक प्रक्रिया सुरु होती, तेव्हा रेंजर्संनी त्यांना अटक केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *