क्राईमताज्या बातम्या

पूजेसाठी आलेले गुरुजीच बायकोला घेऊन पळाले..


मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे एका व्यक्तीला घऱात रामकथेचं वाचन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करणं चांगलंच महागात पडलं आहे. याचं कारण कथावाचन करण्यासाठी आलेला गुरुजीच त्याची पत्नी घेऊन पळून गेला आहे.

हा गुरुजी धीरेंद्र आचार्य यांचा शिष्य आहे. त्यांच्या जागी तो कथावाचन करण्यासाठी आला होता. पण यावेळी भलतंच घडलं असून पीडित पतीने कोतवाली (Kotwali) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनीही तक्रार दाखल करुन घेतली असून, बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल एका महिनेने पत्नीचा शोध लागला. यानंतर पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलावून घेतलं. मात्र यावेळी पत्नीने आपण पतीसोबत राहण्यास इच्छुक नसल्याचं पोलिसांना सांगितलं. तसंच चित्रकूट धामचे धीरेंद्र आचार्य यांचे शिष्य नरोत्तम दास यांच्यासोबतच राहण्याची इच्छा असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2021 मध्ये या प्रकरणाची सुरुवात झाली होती. महिलेचा पती राहुल तिवारी याने गौरीशंकर मंदिरात रामकथेचं आयोजन केलं होतं. कथावाचन करण्यासाठी धीरेंद्र आचार्य यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी धीरेंद्र आचार्य आपला शिष्य नरोत्तम दास दुबे याच्यासह कथावाचन करण्यासाठी आले होते.

राहुल तिवारी याने आरोप केला आहे की, यावेली नरोत्तम दासने आपल्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. नंतर मोबाइल क्रमांक घेत त्यांनी संवाद साधणं सुरु केलं होतं. यानंतर 5 एप्रिलला दोघेही पळून गेले.

पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा जबाब नोंदवून घेतला आहे. महिलेने आपण पतीसोबत राहण्यास तयार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक अमित सांघी यांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही असं सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *