क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

कोट्यवधींच्या नोटांनी भरलेल्या बॅगा पुणे पोलिसांनी पकडल्या..


पुणे : पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना पोलिसाच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रीझा कारमधून पकडल्या.

गुन्हे शाखा, हडपसर पोलिस तसेच वाहतुक पोलिसांच्या मदतीने ही कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली. याबरोबर नोटा मोजण्याची मशीनही पोलिसांनी जप्त केली. यावेळी गांधी आडनाव असलेल्या ४० ते ४२ वय असलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.

शहरात वाहतुक पोलिस तसेच स्थानिक पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात येत आहे. सोमवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास वाहतुक विभागातील कर्मचारी शेवाळवाडी परिसराजवळ असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ संशयीत वाहनांची तपासणी करत असताना त्याला एक व्यक्ती आणि एक महिला संशयास्पदरित्या ब्रीझा कारमधून येताना दिसली. त्याने लागलीच कार थांबवून गाडाची तपासणी केली असता त्याला गाडीच्या मागील डिक्कीत संशायास्पदरित्या बॅगा दिसून आल्या.

त्याने बॅगेच्या चैनी उघडून पाहिल्या असता बॅगेत मोठया प्रमाणावर नोटांचे बंडल असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवल्यानंतर गुन्हेशाखेच्या कर्मचार्यासह हडपसर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ब्रीझा कार हडपसर पोलिस ठाण्यात आणण्यात आली. घटनेची गांभिर्य पाहता गुन्हे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी स्वत: गांधी याच्याकडे विचारपूस केल्यानंतर गांधीकडून ही व्यावसायीक रक्कम असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान नोटांच्या बॅगा असलेल्या गाडीला एका पिस्तुलधारी पोलिसाची सुरक्षा लावण्यात आली.

मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रोकड असलेल्या विमल गुटखा नाव असलेल्या चार बँगा व त्याबरोबर छोट्या मोठ्या बॅगा पंचनामा करण्यासाठी गाडीतून बाहेर काढण्यात आल्या. यावेळी नोटांच्या काही छोट्या बॅगा ब्रीझा कारच्या मधल्यासीट खाली देखील लपवून ठेवण्यात आल्या होत्या त्या बॅगा गांधी याने पोलिसासमक्ष काढून दिल्या. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी बॅगा रोकड मोजण्यासाठी पोलिस ठाण्याच्या आत नेण्यात आल्या. सकाळपर्यंत पोलिसांकडून नोटा मोजण्याचे काम सुरू होते. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का, का ह्या नोटा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविल्या जात होत्या का त्या अनुषंगाने पाेलिसांकडून कसून तपास सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *