ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या लाडक्या सरांची धक्कादायक एग्झिट; मुंबई – गोवा महामार्गावर हृदय पिळवटणारी घटना


राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर तर अपघातांचं सत्र सुरूच आहे. आता मुंबई-गोवा महामार्गावरील आपेडे फाट्याजवळील शिरवली येथून आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे.

याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. शिरवली येथून कळंबणी याठिकाणी जाण्यासाठी आतमध्ये वळत असताना हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत शिक्षक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मालकाला वाचवलं पण लाडक्या खिल्लारी जोडीने साथ सोडली, शेतकरी ढसाढसा रडला या घटनेत शिक्षकाचा मृत्यू झाला असून दुचाकीवर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे.

स्वप्निल संजय भटकर (वय 37, रा. शिरवली ता. खेड जि रत्नागिरी आणि मूळ गाव मुरंबा , ता. मूर्तिजापूर , जि.

अकोला ) असं या घटनेत मृत्यू झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. शिरवली येथून स्वप्निल भटकर हे दुचाकीने कळंबणी येथे जात असता आपेडे फाट्यावर हा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणार्‍या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या घटनेत शिक्षक असलेले दुचाकीस्वार स्वप्निल भटकर यांचा जागीच मृत्यू झाला.

तर मागे बसलेल्या विनोद वसंत जाधव (वय ४२ ) यांना गंभीर दुखापत झाली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकी एसटी बसच्या शेडमध्ये जाऊन आपटली. यात शिक्षक भटकर यांचा जागीच मृत्यू झाला. शिरवली येथील शिक्षक स्वप्नील भटकर यांच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातानंतर जखमींना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, भटकर यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केलं. स्वप्निल भटकर हे वडगाव बुद्रुक येथील शाळेवर नियुक्त होते. सध्या ते कामगिरीवर शिरवली – गुरववाडी या शाळेवर कार्यरत होते. दरम्यान त्यांची मूळ गावी म्हणजे अकोला जिल्हा परिषद येथे बदली झाली होती. मात्र, त्यांना सोडण्यात आलं नव्हतं. त्यांच्या अपघाती निधनाने शिक्षकांसह विद्यार्थीवर्ग आणि पालकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *