नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने रविवारी सुमारे साडेआठ तास चौकशी केली. मात्र, या चौकशीपूर्वी अनेक विरोधी पक्षांनी केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला.
मात्र, केजरीवाल यांच्याबाबत काँग्रेसमधून दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना फोन करून आम्ही तुमच्यासोबत असल्याचं म्हटल. तर पक्षाचे नेते अजय माकन यांनी केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोणतीही सहानुभूती किंवा पाठिंबा देऊ नये, असे म्हटले आहे.
I believe that individuals like Kejriwal and his associates who face serious corruption charges should not be shown any sympathy or support.
The allegations of LiquorGate and GheeGate must be thoroughly investigated and those found guilty should be punished.
It is important for…— Ajay Maken (@ajaymaken) April 16, 2023
काँग्रेस नेते अजय माकन यांनी आज एका ट्विटमध्ये म्हटले की, “माझा विश्वास आहे की, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सहानुभूती किंवा समर्थन दिले जाऊ नये. लिकरगेट आणि घीगेट या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. दोषी आढळल्यास शिक्षा झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.
आपल्या ट्विटमध्ये माकन यांनी लिहिले की, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह सर्व राजकीय नेत्यांनी हे ओळखणे महत्त्वाचे आहे की केजरीवाल यांनी पंजाब, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भ्रष्टाचाराचा पैसा काँग्रेसविरोधात वापरला आहे.