पुणे : वाडा (ता. खेड) येथील पिंगटवाडीत दत्ता धर्माजी पिंगट यांचे रहाते घरी सांयकाळी गॅसचे शेगडीने अचानक पेट घेतल्याने गॅसचा स्फोट झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून जीवनावश्यक वस्तूची मात्र होळी झाली.
वाडा (ता. खेड) येथे दत्ता पिंगट यांचे रहाते घरी सायंकाळी सव्वा सात वाजेचे सुमारास गॅसचे शेगडीने अचानक पेट घेतल्याने दता पिंगट यांनी जाळ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात न आल्याचे पाहून त्यांनी घरातील माणसांना सुरक्षित काढले, तोपर्यंत गॅसचा स्फोट होऊन घराला मोठ्या प्रमाणात आगीने वेढले होते.
हे घर कौलारू असल्याने आगीने तात्काळ पेट घेतला. या आगीने शेजारी राहणारे जीनसु नाना पिंगट यांचे घराला वेढले. त्यांनी तत्काळ मदतीसाठी स्थानिक माणसांन बोलून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दत्ता धर्माजी पिंगट यांचे रहाते घराची अक्षरशः राख झाली असून शेजारी राहणारे जिंसू पिंगट यांचे घर देखील जळले असून त्यात त्यांचे धान्य, कपडे अन्य जीवनावश्यक वस्तू जाळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.