क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

पती आणि सासूला मृत्यूच्या हळूहळू जवळ नेत होती, सलग 7 महिने विषप्रयोग आणि..?


मुंबई : मुंबईत रहाणाऱ्या एका कपडे व्यापाऱ्याच्या हत्येने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्येचा कट आखला होता.

पतीला मारण्याआधी तीने सासूला संपवलं. कोणालाही संशय येणार नाही, अशा पद्धतीने तीने हे सर्व प्लानिंग केलं होतं. इतका सूनियोजित कट पाहून पोलिसही हैराण झाले. या व्यापाऱ्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या (Nature Death) झाल्याचं त्याच्या कुटुंबियांना वाटत होतं. पण हे प्रकरण तितकंस साधंसरळ नव्हतं. यामागे एक भयानक कटकारस्थान रचलं गेलं होतं. त्या व्यावसायिकाचा मृत्यू नाही तर हत्या (Murder) करण्यात आली होती. तब्बल सात महिने ती हा कट रचत होती.

24 ऑगस्ट 2022, सांताक्रूझ, मुंबई
मुंबईतील कपडे व्यावसायिक कमलकांत शाह (Kamalkant Shah Murder Case) यांच्या पोटात अचानक दुखायला लागलं. घरच्यांना आधी हा साधी पोटदुखी असल्याचं वाटलं आणि त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासून त्याला काही औषधं दिली आणि घरी आराम करण्याचा सल्ला दिला. पण यानंतरही कमलकांत यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही.

19 सप्टेंबर 2022
या दरम्यान साधारण वीस-पंचवीस दिवस निघून गेले. कमलकांत यांची तब्येत खालावतच होती. अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण 19 सप्टेंबरला कमलकांत यांचे एकएक अवयव निकामी (Multi Organ Failure) झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती
कमलकांत यांच्या मृत्यूपूर्वी अनेक चाचण्या करण्यात आल्या होत्या, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नव्हतं. पण मृत्यूनंतर केलेल्या रक्ताच्या चाचणीत जी माहिती समोर आली ती संपूर्ण कुटुंबाला आणि डॉक्टरांनाही हादरवणारी होती. कमलकांत यांच्या रक्तात धातूचं प्रमाण जास्त होतं. जे माणसाच्या शरीराला घातक ठरू शकतं. कमलकांत यांच्या शरीरात आर्सेनिक (Arsenic) आणि थॅलियमचं (Thallium) मिश्रन आढळलं. आर्सेनिकचं प्रमाण 400 टक्के जास्त तर थॅलियमचं प्रमाण 365 टक्के जास्त होतं. यामुळे कमलकांत यांच्या मृत्यूद्दल संशय निर्माण झाला. कमलकांत यांच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

कमलकांत यांच्या आईच्या मृत्यूवरही प्रश्न
कमलकांत यांच्या मृत्यूआधी त्यांच्या आईचाही असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. 13 ऑगस्ट 2022 ला त्यांचा मुंबईतल्या एका मोठ्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. कमलकांत यांच्या आईच्या मृत्यूचं कारणही मल्टि ऑर्गन फेल्यूअर हेच होतं.

कमलकांत यांच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा
कमलकांत आणि त्यांच्या आईच्या मृत्यूमागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी कमलकांत यांची पत्नी काजल आणि संपूर्ण कुटुंबियांची चौकशी केली. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती हाती लागली. कमलकांत यांची बहिण कविताने दिलेल्या माहितीनुसार कमलकांत जेव्हा रुग्णालयात दाखल होते, त्यावेळी त्यांची पत्नी काजल त्यांच्या बँक अकाऊंटबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तीने पोलिसांना सांगितलं. इतकंच नाही तर कमलकांत यांच्या मृत्यूनंतर काजलने त्यांच्या लाईफ इंशुरन्स पॉलिसीबद्दलही (Insurance Policy) माहिती काढली होती.

कमलकांत यांच्यावर झाला होता विषप्रयोग
पतीच्या मृत्यूचं पत्नी काजलला फारसं दु:ख झालं नसल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं होतं. ही माहितीही त्यांनी पोलिसांनी दिली. याशिवाय कमलकांत यांच्या शरीरात आर्सेनिक आणि थॅलियमचं प्रमाण अधिक आढळून आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आर्सेनिक आणि थॅलिअम हे शरीरावर हळूहळ परिणाम करतं. ते अन्नात मिसळल्याने अन्नाची चवही बिघडत नाही किंवा अन्नाचा रंगही बदल नाही. पण ते शरीराला हळूहळ पोखरू लागतं. एकाच घरात राहून आणि एकत्र जेवूनही कमलकांतच्या शरीरात आर्सेनिक आणि थॅलियमचं प्रमाण जास्त कसं असा प्रश्न पोलिसांना पडला.

काजलच्या कॉल रेकॉर्डची तपासणी
पोलिसांचा कमलकांतची पत्नी काजलवरचा संशय वाढू लागला. पोलिसांनी काजलच्या मोबाईलचा सीडीआर म्हणजे कॉल डिटेल तपासले. यात काजल हितेश जैन नावाच्या एका व्यक्तीशी तासनतास बोलत असल्याचं समोर आलं. याआधारे पोलिसांनी हितेश जैन नावाच्या व्यक्तीचा शोध सुरु केला.

काजलन प्रियकराबरोबर मिळून रचला कट
संशयावरुन पोलिसांनी काजलची पुन्हा चौकशी केली, सुरुवातीला काजलने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसी खाक्या दाखवताच काजलने आपला गुन्हा कबूल केला. काजलने हितेशबरोबर मिळून पती कमलकांतची हत्या केली होती. काजल आणि हितेशचे प्रेमसंबंध होते. कमलकांतच्या मृत्यूनंतर त्याचे पैसे घेऊन हितेशबरोबर रहाण्याचा तिचा प्लान होता.

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !

कमलकांतवर केला विषप्रयोग
कमलकांत यांच्या जेवणात आर्सेनिक आणि थॅलिअमचं मिश्रन करत असल्याचं काजलने कबूल केलं. प्रियकर हितेश जैनने तिला ही आयडीया दिली होती. कमलकांत आणि हितेश लहानपणापासूनचे मित्र होते. हितेशचं कमलकांतच्या घरात येणं जाणं होतं. लग्नानंतर कमलकांत आणि काजलमध्ये खटके उडू लागले होते. हे सर्व ती हितेशला सांगत होती, यातूनच दोघांचे प्रेमसंबंध जुळले.

7 महिन्यांपासून सुरु होता कट
कमलकांतबरोबरच्या सततच्या भांडणामुळे काजल आपल्या मुलांना घेऊन घरातून निघून गेली होती. पण 15 जूनला ती पुन्हा सासरी परतली. कमलकांत आणि त्याच्या आईला संपण्याचा कट तीने रचला होता. ठरल्यानुसार काजल पती आणि सासूला जेवणातून विष देऊ लागली. तब्बल सात महिन्यांच्या विषप्रयोगानंतर कमलकांत आणि त्याच्या आईच्या शरीरावर याचे परिणाम दिसू लागले. अखेर यातच दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी काजल आणि हितेश दोघांनाही अटक केली आहे.

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *