क्राईमताज्या बातम्या

सोसायटीच्या व्यवस्थापकाने सोसायटीच्या लाखो रुपयांचा केला अपहार


सोसायटीच्या व्यवस्थापकाने सोसायटीच्या चेकबुकचा वापर करून सोसायटीच्या खात्यातून सहा लाख 94 हजार 200 रुपये काढून अपहार केला.

(Wakad) हा प्रकार 14 ऑक्टोबर 2022 ते 11 एप्रिल 2023 या कालावधीत वाकड येथे घडला.

आशिष शामलाल जगडावत (वय 37, रा. थेरगाव. मूळ रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल प्रल्हाद कनगरे (वय 31, रा. थेरगाव. मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोसायटीचे सचिव आहेत. त्यांच्या सोसायटीमध्ये आरोपी व्यवस्थापक म्हणून काम करत होता. (Wakad) त्याने सोसायटीच्या चेकबुकचा वापर करून सोसायटीच्या खात्यातून सहा लाख 94 हजार 200 रुपये काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *