जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील रायवाडा इथे सशस्त्र दरोडा घालण्यात आला. खानापूरच्या माजी सरपंच पूनम गुरव यांच्या घरावर हा सशस्त्र दरोडा टाकला गेला आहे.
एकाच कुटुंबातील तिघांना दोरीने बांधून अज्ञात 25 जणांच्या टोळीने हा दरोडा घातला. यामध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदी, काजूगर व रोख रक्कमेसह यॉकशार्क प्रकारची 220 पाळीव डुकरे पळवली आहेत. ही घटना रात्री तीनच्या सुमारास चिरका नावाच्या शेतात घडली आहे. कशी घडली घटना? प्राथमिक माहितीनूसार, आयशर टेंपोमधून आलेल्या 20 ते 25 जणांच्या टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवून गुरव यांच्या घरावर दरोडा टाकला.
नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !
चोरट्यांनी रात्री दहशत माजवत दरवाजे तोडले. प्रल्हाद यांच्यासह पत्नी पूनम तसेच राजेश गुरव यांना खुर्च्यांना बांधून घालून त्याच्याकडील मोबाईल काढून घेतले. त्यामुळे या दरोड्यावेळी कोणाशी संपर्क साधणेही गुरव यांना शक्य झाले नाही. शेजारी राहणाऱ्या कोरवी यांनी त्यांना सोडविले.
यावेळी चोरट्यांनी 220 पाळीव डुकरे, 200 किलो काजूगर, सोने चांदी व दोन मोबाईल यासह अन्य घरगुती अंदाजे 9 लाख 17 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. घडलेल्या प्रकाराने गुरव कुटुंबिय हादरले आहे.
चोरट्यानी केलेल्या मारहाणीत प्रल्हाद गुरव, पूनम गुरव व राजेश गुरव जखमी झाले. बुधवारी सकाळी पोलीसांनी घटनास्थळी माहिती घेतली.यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस डी वाय एसपी राजीव नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, श्वान घराभोवतीच घुटमळले. पोलिसांच्या काही टिम चोराचा तपासाठी रवाना झालेले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.