धान्याचा काळा बाजार करणार्या तिघांना बेड्या, काळ्या बाजाराने धान्य विक्री करणारे स्वस्त धान्य दुकानदार रडारवर
शहरातील वेगवेगळ्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून तांदूळ काळ्या बाजारातून विकत घेऊन नंतर तो तांदूळ केडगाव येथे विक्रीसाठी जात असताना खडक पोलिसांनी छापा टाकत टेम्पो पकडून तिघांना बेड्या ठोकल्या.
संशयित आरोपींना स्वस्त धान्य विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. जावेद लालु शेख (35), अब्बास अब्दुल सरकावस (34) आणि इम्रान अब्दुल शेख (30, तिघेही रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश प्रकाश जाधव यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी खडक पोलिसांना अवैधरित्या स्वस्त धान्य दुकानदारांडून काळ्या बाजार भावाने तांदळू खरेदी करून तांदळ्याच्या गोण्यांनी भरलेला टेम्पो केडगाव येथे विक्रीसाठी निघाल्याची माहिती मिळाली. हे माहिती मिळताच काशेवाडी येथील राजीव गांधी सोसायटी येथे हा टॅम्पो पोलिसांनी पकडला. त्यांच्याकडून मालवाहू टेम्पोसह 15 किलोच्या 54 तांदळाच्या पिशव्या असा तब्बल 2 हजार 700 किलो तांदूळ जप्त करण्यात आला. यावेळी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता, हा धान्यसाठा त्यांच्याकडून विक्रीसाठी नेत असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघांनी काळ्या बाजारात धान्य खरेदी करून विक्रीसाठी ते धान्य चालवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आमच्या पथकाने कारवाई करून तब्बल 2 हजार 700 किलो तांदूळ पकडले. त्यांना ते तांदूळ कोणत्या दुकानादारांनी विकत दिले, याचा सध्या तपास सुरू आहे.
– संगिता यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खडक पोलिस ठाणे.मोठे रॅकेट असण्याची शक्यता
स्वस्त धान्य दुकानदारांकडून तांदूळ खरेदी करून त्याची विक्री चढ्या किंमतीला करण्याचा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. त्यांना हे धान्य रेशनिंग दुकानदारांनी कसे विकत दिले? ते दुकानदार कोण आहेत? यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून हा काळा बाजार केव्हा पासून सुरू होता याचा देखील शोध घेण्याची आवश्यकता आहे. नारिकांच्या तोंडचा घास पळविणार्यांचे मोठे रॅकेट असण्याची देखील शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे.
नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !