ताज्या बातम्यामहत्वाचेसंपादकीय

सबका साथ सबका विकास, ही भाजपाची कार्यशैली – पंतप्रधान नरेंद्र मोदी


‘भाजपासाठी राष्ट्र प्रथम हाच मूलमंत्र आहे. सबका साथ सबका विकास, ही भाजपाची कार्यशैली आहे’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजपाच्या कार्यकर्तांना भाजपाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भाजपाचा आज 44वा वर्धापन दिन सोहळा आहे. या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून देशभारातील सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (Sabka Saath Sabka Vikas is BJP working style says Prime Minister Narendra Modi)

“आज आपण आपल्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत आहोत. भाजपाच्या स्थापनेपासून आतापर्यंत ज्या महान व्यक्तिंनी आपल्या रक्ताचे पाणी करून पक्षाला पुढे नेले, पक्षाला समृद्ध केले, पक्षाला सशक्त केले, पक्षाच्या आवाजाला बुलंद केला आहे, त्या सर्व छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेतेमंडळींच्या समोर मी आज नतमस्तक होत आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“आज आपण देशाच्या काना-कोपऱ्यात हनुमान जयंती साजरी करत आहोत. हनुमानाचा जयघोष चहुबाजुंना घुमतोय. हनुमानाचे काही प्रमुख प्रसंग भारताच्या विकास यात्रेत आपल्याला प्रेरणा देतात. हनुमानाकडे प्रचंड शक्ती आहे. पण या शक्तीचा वापर ते तेव्हाच करायचे जेव्हा त्यांचा स्वत: वरील संयम सुटायचा. बजरंगबली भाजपाचे प्रेरणास्रोत आहे. भारत बजरंगबलीप्रमाणे बलशाली बनत आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही जे हनुमान करू शकत नाही. लक्ष्मणासाठी हनुमानाने संजीवनी बुटीसाठी संपूर्ण पर्वतच आणले. या प्रेरणेने भाजपाने नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असून, यापुढेही करणार आहे”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

“भाजपासाठी राष्ट्र प्रथम हाच मूलमंत्र आहे. सबका साथ सबका विकास ही भाजपाची कार्यशैली आहे. जेव्हा भ्रष्टाचार आणि कौटुंबिक वादाचा प्रश्न निर्माण होतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते. त्यावेळी भाजपा संकल्पबद्ध होते. या सर्वातून मुक्त करण्यासाठी कठोर व्हायला लागले तर, भाजपा कठोर सुद्धा होते”, असेही मोदी म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *