काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 भाजप, एक JDS बंडखोरांसह 42 उमेदवारांना तिकीट..
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं (Congress Party) आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीये.
2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104, काँग्रेसला 78 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या.यादीत 42 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय.
विशेष म्हणजे, काँग्रेसनं भाजप (BJP) आणि जेडीएस (JDS) सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या 3 जणांना तिकीट दिलंय.
Congress releases second list of 42 candidates for Karnataka Assembly elections pic.twitter.com/wzpumgNTf3
— ANI (@ANI) April 6, 2023
यादीत भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार गोपालकृष्ण, बाबुराव चिंचनसूर आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आणखी एका आमदाराला तिकीट देण्यात आलंय. यासोबतच जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार श्रीनिवास यांना गुब्बीमधून रिंगणात उतरवण्यात आलंय.
कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल लागणार आहे. काँग्रेसनं या निवडणुकीसाठी आतापर्यंत 164 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज आणखी 42 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
पक्षानं दुसऱ्या यादीत निपाणी मतदार संघातून माजी आमदार काकासाहेब पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे. दरम्यान, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104, काँग्रेसला 78 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. 23 मे रोजी येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार स्थापन झालं. 14 महिन्यांनंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांच्या बंडानंतर कुमारस्वामींना खुर्ची सोडावी लागली होती.