स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे हाच खऱ्या अर्थाने गौरव -आशिष अण्णा देशमुख
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे हाच खऱ्या अर्थाने गौरव – आशिष अण्णा देशमुख.
अखंड हिंदुस्तानाचे मानबिंदू भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे देशासाठी असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे. गेल्या कित्येक वर्षांपासून संपूर्ण देशभरातील सावरकर प्रेमींनी ही मागणी केली आहे .महाराष्ट्राच्या विधिमंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा या विषयावर विधिमंडळात देखील चर्चा घडवून आणली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशभक्ती, अस्पृश्यता निवारण, आणि जातीभेद नष्ट करण्यासाठी खऱ्या अर्थाने काम केले. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेल्या अशा या महान क्रांतिकारकाला केंद्र सरकारने भारतरत्न हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे. ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध आपल्या संसाराची अक्षरक्षा होळी करून हा क्रांतिकारक स्वातंत्र्य मिळावे यासाठी शहीद झाला ब्रिटीशांनी त्यांना मंडलीच्या तुरुंगात डांबून अतिशय कठोर शिक्षा केली. तरी पण तुरुंगात देखील सावरकरांनी देशभक्तीपर लिखाण केले ,””ने मजसीने परत मातृभूमीला ;सागरा प्राण तळमळला; तळमळला!” हे वाक्य त्यांचे देशप्रेम दाखवून देते. अशा महान स्वातंत्र्य सेनानी कवी देशभक्त तपस्वीला भारतरत्न देऊन येणाऱ्या पिढ्यांना त्यांचे विचार कळावेत म्हणून सन्मानित करण्यात यावी तोच त्यांचा खऱ्या अर्थाने गौरव ठरेल असे प्रतिपादन भारतीय महाक्रांती सेना तथा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेते आशिष अण्णा देशमुख यांनी केले आहे