पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 6 वाहनं एकमेकांना धडकली; वाहनांचं मोठं नुकसान
सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावाच्या हद्दीत सहा वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. सहा वाहने एकमेकांवर धडकली.
यामध्ये 3 ट्रक, 2 टेम्पो आणि एका कारचा समावेश आहे.
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. पुणे- सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावाच्या हद्दीत सहा वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. सहा वाहने एकमेकांवर धडकली. यामध्ये 3 ट्रक, 2 टेम्पो आणि एका कारचा समावेश आहे.
पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना समोरील वाहनाने अचानक ब्रेक मारल्यानं मागून येणारी वाहने एकमेकांना धडकली. अपघातात रस्त्यावर थांबलेले प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर या मार्गावरची वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
कारने अचानक ब्रेक मारल्याने अपघात
पुणे सातारा महामार्गावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने कापूरहोळ गावच्या हद्दीत अचानक ब्रेक मारला. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. कापूरहोळमधील चौकात त्याला वळायचे होते म्हणून अचानक त्याने कारला ब्रेक मारला. समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे कारच्या मागून वेगात येणारी वाहने अनियंत्रित झाली. यामुळे सहा वाहने एकमेकांवर आदळली.