मुलीची लग्नपत्रिका वाटायला निघाले पण रस्त्यातच काळ आडवा आला, वडील ठार, मामा जखमी
वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेले साळे-जावई मुलीच्या लग्नाच्या पत्रि
वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेले साळे-जावई मुलीच्या लग्नाच्या पत्रिका द्यायला थुगावदेव येथे गेले होते.
परतीच्या प्रवासात वरूडकडे येताना आमनेरनजीक वळण रस्त्यावर एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी अनियंत्रित होऊन मागील चाकावर आदळल्याने दुचाकीचालक जावई जागीच ठार, तर साळा जखमी झाला. हा अपघात सोमवारी दुपारी १ च्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार मृताचे नाव दिवाकर गजानन घारपुरे (५५, रा. बोरगाव ता. कारंजा घाडगे), तर जखमींचे नाव हरिभजन सदाशिव बोआडे (५१, रा. नारा, ता. कारंजा घाडगे) असे आहे. जखमी साळ्याच्या मुलीचे १७ एप्रिलला, तर मृत जावयाच्या मुलीचे २८ एप्रिलला लग्न होत आहे. या विवाहाच्या निमंत्रण पत्रिका द्यायला नागपूर जिल्ह्यातील थुगावदेवला जाऊन वरूड मार्गे ते परत येत होते.
आमनेरनजीक वळण रस्त्यावर दुपारी एक वाजताच्या दरम्यान वरूडकडे जाणारी एसटी बस (एमएच ४० एन ५१०३) ला मागून येणाऱ्या दुचाकी (एमएच ४० व्ही ४४९९) ने निघालेल्या साळा-जावयाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अचानक समोरून जड वाहन दिसताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती बसच्या मागच्या चाकावर आदळली. यामध्ये दुचाकीचालक दिवाकर घारपुरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेले हरिभजन बोआडे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वरूड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेसंदर्भात पोलिसांनी एसटी बसचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांचे मार्गदर्शनात वरूड पोलिस करीत आहे.
का द्यायला थुगावदेव येथे गेले होते.