दिल्लीत एका वकिलाची सार्वजनिकस्थानी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दक्षिण द्वारका भागातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
वी दिल्ली : दिल्लीत एका वकिलाची सार्वजनिकस्थानी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दक्षिण द्वारका भागातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मृत वकिलाचे नाव वीरेंद्र असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आतापर्यंतच्या तपासानुसार हे संपूर्ण प्रकरण परस्पर वैमनस्यातून असल्याचे दिसते. मात्र, पोलिस या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूंचा तपास करत आहेत.
या घटनेचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणाच्या तपासात आरोपी दुचाकीवरून आल्याचे निष्पन्न झाले आहे. वीरेंद्रवर गोळीबार झाला तेव्हा ते त्यांच्या गाडीत होते. आरोपींनी वीरेंद्रवर अनेक राऊंड गोळीबार केला.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. जेणेकरून ते आरोपींना ओळखू शकतील. यासोबतच पोलीस घटनास्थळाजवळ राहणाऱ्या काही लोकांचीही चौकशी करत आहेत.