हनिमूनच्या दिवशी मुलगी सासरी निघून गेल्याने संतापलेल्या पतीने सासू आणि पत्नीचे अपहरण केले आहे. आरोपीने नंतर सासूला सोडले असले तरी पत्नीला सोडले नाही. सध्या या प्रकरणात मंत्र्याची एन्ट्री झाल्यानंतर पीडित मुलगी आरोपीच्या तावडीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाली, तर आरोपी त्याच्या साथीदारांसह पळून गेला आहे.
भोपाळ : पंचायतमध्ये तैनात असलेल्या महिला ग्रामीण रोजगार सहाय्यकाचे तिच्या पतीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या आईने पोलिसांत दाद मागितल्यानंतर पोलिस सक्रिय झाले, मात्र ही बातमी कळताच पतीने अपहरण केलेल्या पत्नीला गायब केले. नंतर पीडितेच्या भावाने मंत्र्याकडे दाद मागितल्यानंतर पोलीसही सक्रिय झाले आणि आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका करून घेतली, मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहेत.
नवऱ्याने सासू सह पत्नीचे केले अपहरण
काय आहे प्रकरण : बेरसिया परीसरातील ग्रामपंचायतीचे हे प्रकरण आहे, अपहरण झालेल्या मुलीचे लोक गावापासून दूर शेतात राहतात. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २० मार्च रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास अचानक एक बोलेरो गाडी घराबाहेर थांबली आणि त्यातून ३-४ पुरुष बाहेर आले, महिलेने दरवाजा उघडला तेव्हा त्यांनी मुलीला आणि तिच्या आईला बोलेरामध्ये बसण्यास भाग पाडले. त्यांना घेऊन गंजबासोडा येथे नेले, मात्र नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर आरोपीने आईला सोडले, परंतु मुलीला सोडले नाही.
गृहमंत्र्यांना पत्र : आई परत येताच सोबत तिच्या मुलासह तिने पोलिस ठाण्यात कैफियत मांडली, त्यानंतर पोलिस सक्रिय झाले आणि 3 दिवसांनी मुलीला आनण्यासाठी निघाले तेव्हा मुलगा आणि मुलगी घरी नसल्याचे समजले. त्यामुळे शेवटी पोलिसांना तसेच परतावे लागले. त्यानंतर मुलीचा भाऊ भूपेंद्र याने २६ मार्च रोजी पुन्हा पोलिस ठाण्यात तक्रार केली आणि एक पत्र गृहमंत्र्यांना तसेच डीजीपीला टॅग केले त्यानंतर २७ मार्च रोजी पोलिस सक्रिय झाले आणि मुलीचा शोध घेतला, रात्री मुलीला परत आणले.