अहमदनगरक्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

दूध भेसळीच्या गोरख धंद्यात अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल, दूध भेसळीचा 89 लाखाचा मुद्देमाल जप्त


दूध भेसळीच्या गोरख धंद्यात अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल, दूध भेसळीचा 89 लाखाचा मुद्देमाल जप्त.

श्रीगोंद्यात दुधात रसायन पावडरची भेसळ करून दुधाची निर्मिती…

श्रीगोंदा : ( आशोक कुंभार ) एक गाय आणि सातशे लिटर दूध अशा प्रकारचा गोरख धंदा आष्टी येथे दुधात पावडर व रसायनाची भेसळ केली जात होती मागिल काही वर्षांपासून काळातील, दुध भेसळीचा गोरख धंदाची माहिती अन्न व औषध प्रशासनाने माहिती मिळालेली होती, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे रा संभाजीनगर आष्टी श्रीगोंदा याचा दूध धंद्यातील भेसळीच्या काळ्या बाजाराचा पडदा अन्न व भेसळ विभागाने पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील आष्टी संभाजीनगर भागात सतीश नागनाथ शिंदे यांच्या मालकीचे जगदंबा मिल्क प्रॉडक्ट नावाची फॉर्म असून या ठिकाणी भेसळीचा गोरख धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांनी अन्न व औषधे प्रशासनाला मिळाल्याने विभागाचे सहाय्यक आयुक्त इमरान हाश्मी यांनी गुरुवारी छापा टाकला त्यावेळी भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकल पावडरच्या 132 गोण्या आणि रसायनचे 220 डबे एक वाहान ( वाहाना या गाडी मालकाचे, पोलिसांकडून गाडीचे नाव, वाहान मालकाचे नाव आणि गाडी नंबर गुलदस्त्यात ठेवण्यात आलेली आहे!) मुद्देमाल,अन्न औषध प्रशासन व पोलिसांनी जप्त केले आहेत. याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत गुप्त तक्रारीवरून सतीश नागनाथ शिंदे नंदू मेमाणे यांचे विरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे नंदू मेमाणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर ठाकूर डीवायएसपी अभिषेक अभिजीत धारशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिया हेमंत कदम पीएसआय प्रमोद काळे आधी काम पाहत आहेत.
एक आरोपींला पोलीस कोठडी, तर मुख्य आरोपी शिंदे फरार….
अन्न व औषध प्रशासनाकडे आलेल्या तक्रारीवरून सतीश नागनाथ शिंदे, नंदू मेमाणे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे तर नंदू मेमाने याला ताब्यात घेतले असून त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे. प्रमुख आरोपी सतीश शिंदे हा फरार आहे.
सतीश शिंदेच्या दूध संघातले, दूध हे पुणे जिल्ह्यातील मंचर येथील डेरीला पाठवले जात असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे तर भेसळीसाठी ची वापरण्यात येणारी पावडर ही सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते इथून आणली जात होती. मात्र लिक्वीड रसायन कुठून आणले जात होते याचा अद्याप तपास पोलिसांना लागलेला नाही, पोलीस तपास करत आहेत.
पावडर आणि रसायन वापरून हजारो लिटर दूध, दररोज तयार केले जात होते…,,
सतीश शिंदे यांच्या माध्यमातून एवढे प्रचंड राकेट हे आष्टी श्रीगोंदा नगर जिल्ह्यात कार्यरत असून ज्यांच्याकडे एक गाय आहे त्यांच्याकडे पाचशे ते सातशे लिटर दूध डिअरीला विकले जाते हा दूध भेसळीचा प्रचंड मोठा मोठे रॅकेट उघडकीस आहे. ज्या पद्धतीने दूध भेसळीचा गोरख धंदा सतीश शिंदे कडून अनेक वर्षापासून सरळ सुरू होता मात्र याची का,कूई सुध्दा पोलिसांना का लागली नाही? हा गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनलेला असून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला पकडल्याच्या नंतर दूध भेसळीचे व डेरीचे लागे बांधे, धागेदोरे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या डेरीपर्यंत पोचतात याचा पोलीस आणि अन्न भेसळ प्रशासन विभाग समाचार घेईल का हा खरा प्रश्न दूध व अन्न भेसळ प्रशासनाने कडे लोकांचे डोळे लागून राहिलेले आहे. राज्यातील प्रचंड दूध भेसळ व दूध दरातील चढ-उतार याबाबत संघटनेने विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे राज्य शासनाने दूर भेसळ, दूध भेसळ प्रतिबंधक व वजन काटे यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश शासन निर्णय काढून केलेले होते त्याचे पालन राज्यात होत नाही, होत असताना अजिबात दिसत नाही असे शेतकरी संघटनेने अहमदनगर जिल्हा कलेक्टर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
राज्यातील पुणे मुंबई नागपूर ठाणे आधी मोठ्या शहरातील सर्वसामान्य गोरगरीब व बाल गोपाळांना देण्यात येणारे दूध हे “जहर,, झालेले असून सतीश शिंदे सह संबंधित सर्व आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघ़टनेने केलेली आहे, दूध भेसळखोर व मोठे डेअरी मालक यांच्या संबंधितांचे धागेद्वारे जिथपर्यंत पोहोचलेले आहेत ते सर्व लागेबांधे पोलिसांनी खोदून काढावेत आणि दूध भेसळीमध्ये सापडलेल्या सतीश शिंदे, नंदू मेमाने सह सर्व आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संबंधितांना जेलची हवा दिल्याशिवाय अन्न व भेसळ प्रशासनाने स्वस्त राहू नये अशी मागणी शेतकरी संघटनेने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे, मा.श्री. सिद्धाराम सालीमठ अहमदनगर जिल्हा अधिकारी यांचेकडे केलेली आहे.
अन्न भेसळखोर काँग्रेस राष्ट्रवादी आणि संबंधित पक्षांच्या दुध व्यापारी, दलाल नेत्यांमुळे दूध उत्पादक शेतकरी बदनाम होत असल्याची संघटने कडून गंभीर दखल, संघटनेची अण्णांना लक्ष घालण्याची विनंती…
राज्यातील पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, सोलापूर जिल्हा, आणि सातारा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये दूध भेसळीचे मोठ्या प्रमाणावरती प्रकरण उघडकीस झालेले आहेत, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे. जळगाव जिल्ह्यात देखील भडगांव येथे हजारो लिटर दूध भेसळ करणारे दूध दूध व्यापारी, शेतकरी संघटनेने पकडलेले असून त्यावर भडगाव पोलीस प्रशासनाकडून कारवाई न करता पडदा टाकण्यात आलेला असून ती परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आत्तापर्यंत दूध भेसळीमध्ये सापडलेले सर्वच भेसळखोर नेते काँग्रेस-राष्ट्रवादी व अन्य पक्षाचे नेते व्यापारी दलाल यांचे मुळे कारण नसताना राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हा बदनाम झालेला आहे, दूध व्यापारी दलाल नेत्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना बदनाम केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हे शासन प्रसारण काम असून दुग्ध विकास मंत्री मुख्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या आष्टी श्रीगोंदा तालुक्यात एक गाय आणि 500 ते 700 लिटर दूध असे अनेक महाभाग त्या ठिकाणी सपडलेले आहेत व तेही उघडकीस आलेल्या आहेत त्यामध्ये सतीश शिंदे, नंदू मेमाणे या दूध बेसळखोरांची सर्व साखळी पकडून दूध भेसळखोरांवर सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा आरोप ठेवून देह दंडाचा व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा आशयाचे लेखी पत्र व्यवहार शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची समक्ष भेट घेऊन निवेदन दिलेले आहे यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील अनिल भांडवलकर पांडुरंग कोतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *