क्राईमताज्या बातम्यापुणे

पुण्यातील 14 वर्षीय मुलीला लग्नाच्या आमिषाने नेलं अन् मध्य प्रदेशात 50 हजारांत विकलं..


पुणे : ( आशोक कुंभार ) विवाहासाठी एका १४ वर्षीय महाराष्ट्रीयन मुलीची (Maharashtrian Girl Sold in MP) फसवणूक करत मध्यप्रदेशात नेऊन ५० हजारात विक्री केली. तसेच, तिचा येथील एका तरुणाशी विवाह जबरदस्तीने लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीला प्रियकर मध्य प्रदेशात गेल्याची बतावणी केली. तसेच, तिला तुला भेट घालून देते आणि तुझा त्याच्याशी विवाहही लावते म्हणत नोकरीच्या बहाण्याने पुण्यात आलेल्या मध्यप्रदेशातील महिलेने पुण्यातून नेले होते. पण, भारती विद्यापीठ पोलिसांनी या मुलीची मध्यप्रदेशातील ग्यारा ग्राम या गावातून सुखरूप सुटका करून महिलेसह तरुणाला अटक केली आहे.

धर्मेंद्र किलेदारसिंग यादव (वय २२, रा. ग्यारा ग्राम, ता. सेवढा, जि. दतिया. मध्यप्रदेश) तसेच शांती उर्फ सन्तो हरनाम कुशवाह (वय ४०) यांना अटक केली आहे. याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद होता. ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात, रवींद्र चिप्पा, सागर कोंडे, पुजा लोंढे व त्यांच्या पथकाने केली आहे.

कात्रज परिसरातून एक १४ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली. या तक्रारीचा तपास उपनिरीक्षक अतुल थोरात हे करत होते. त्यांना मुलीला प्रेमाच्या जाळ्यातून मध्यप्रदेशात नेल्याची माहिती मिळाली. माहिती घेताना मुलगी ग्यारा ग्राम शहरात असल्याचे समजताच पोलिसांनी पथकाने याठिकाणी धाव घेतली. एका घरात छापेमारी करत मुलीची सुखरूप सुटका केली.

मुलीकडे चौकशी केल्यानंतर शांती उर्फ सन्तो हिने या मुलीला येथे आणल्याचे समजले. पोलिसांनी प्रथम शांतीला पकडले. तसेच तिला विचारपूस केल्यानंतर पूर्ण घटनेचा पर्दाफाश झाला. तिने धर्मेंद्र याला ५० हजारांत या मुलीला विवाहासाठी विक्री केल्याचे समोर आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *