डिसेंट फाउंडेशन जुन्नर पुणे आयोजित, एक आधाराची काठी आजी-आजोबांसाठी..
जुन्नर प्रतिनिधी : सतिश शिंदे, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री नंदकुमार जगन्नाथ बिडवई यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यातील मढ येथील वृद्धांना आधाराच्या काठांचे वाटप करण्यात आले.
एक आधाराची काठी आजी-आजोबांसाठी या उपक्रमांतर्गत डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील शंभर वृद्ध आजी-आजोबांना आधाराच्या काठांचे वाटप करण्यात येणार आहे.
आपण आपल्या कुटुंबासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय कष्टमय प्रवास केलात. आता वृद्धापकाळात चालताना आधार मिळावा, चालता यावं, फिरता यावं यासाठी या आधार काठ्यांचे वाटप करण्यात येत असल्याचे डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक आणि श्री लेण्याद्री गणपती देवस्थानच ट्रस्ट चे अध्यक्ष श्री जितेंद्र बिडवई म्हणाले.
यावेळी डिसेंट फाऊंडेशनचे सचिव फकीर आतार, वडज विठ्ठलवाडी गावचे सरपंच आदिनाथ चव्हाण , सावित्रीबाई फुले वृद्धाश्रमाच्या संचालिका नंदाताई मंडलिक, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे, शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग मोढवे, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री कदम, सत्यवान खंडागळे, हरि रामदास बाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मस्करे, सचिव मुरलीधर मोढवे, शितळादेवी महिला जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा मनाबाई मस्करे व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर मोढवे यांनी केले, प्रास्ताविक फकीर आतार यांनी केले तर आभार पांडुरंग मोढवे यांनी मानले.