पुणे : (आशोक कुंभार )राज्यात गुन्ह्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. गुन्हे करणाऱ्या आरोपींना पोलीस तात्काळ अटक करून त्यांची रवानगी तुरुंगातही करत असतात. यातील काही गुन्हेगार नवखे असतात तर काही सराईत असतात.
त्यामुळे पोलीस गुन्हा आणि गुन्हेगारांची पार्श्वभूमी पाहूनच कारवाई करत असतात. पण पुण्यात एक वेगळाच आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. थेट पोलिसांच्या नावानेच लाच मागितल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना घडल्यानंतर लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक केली. पण त्यात चक्क काँग्रेसच्या आमदाराचा नातेवाईकच आढळून आल्याने यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. आता या प्रकरणाचा लाचलूचपत विभागाकडून सखोल तपास केला जात आहे.

पोलिसांच्या नावाने 3 लाखांची मागणी करणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून धक्कादायक म्हणजे तीन लाखांची मागणी करणारे पुरंदरचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप (रा .सासवड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांची लाचलूचपत विभागाकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
तक्रारदाराने सासवड पोलिसात अर्ज केला होता. त्या अर्जावरून सासवड पोलीस स्टेशननचे पोलीस निरीक्षक घोलप यांच्या करीता तीन लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच या मागणीमध्ये गणेश जगताप नावाच्या व्यक्तीने देखील मदत केल्याचे समोर आले आहे. यावरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले आहे.
अटक केल्यापैकी एकजण आमदार संजय जगताप यांचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संजय जगताप यांचा या घटनेशी काही संबंध तर नाही ना अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. याशिवाय अक्षय मारणे आणि गणेश जगताप हे आणखी राजकीय नेत्यांची कामे करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे राजकारणी कोण आहेत? त्यांच्यासाठी या आरोपींनी लाच मागितली का? आतापर्यंत किती वेळा लाच मागितली? कुणाकुणाला फसवलं? याची माहिती लाचलूचपत विभागाकडून घेतली जात आहे.