छत्रपती संभाजीनगर : जागतिक जल दिन 22 मार्च चे औचित्य साधून गावात जल जीवन मिशनचे काम पूर्ण झाले असल्यास गाव
हर घर जल घोषित करावे किंवा हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ प्लस) च्या निकषाची पूर्तता केल्यास 22 मार्च जागतिक जल दिनी ग्रामसभा घेऊन बैठकीत ठराव पारित करण्याच्या सूचना केंद्रीय पेयजल स्वच्छता विभाग, जलशक्ती, पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवानी पत्राद्वारे दिलेल्या आहेत
जल जीवन मिशनच्या निकषानुसार गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्थांना नळ जोडणी द्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमित करीत असल्यास गावात ग्रामसभेत बैठक घेऊन हर घर जल ची घोषणा करावी तसेच गावात हागणदारीमुक्त अधिक ऑडिओ प्लस यांनी निकषाची पूर्तता यामध्ये गावातील सर्व कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरथन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निकषाची पूर्तता केल्यास गावात 15 ते 22 मार्च 2023 दरम्यान ग्रामसभेत बैठक घेऊन ठराव पारित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत
जल जीवन मिशन अंतर्गत काम पूर्ण झालेल्या गावांनी हर घर जल ची घोषणा तसेच हागणदारी मुक्त अधिक(ऑडिओ प्लस) निकषाची पूर्तता केलेल्या गावांनी 22 मार्च जागतिक जल दिनी गावात ग्रामसभेचे आयोजन करून गाव घोषित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी केले आहे