बहुजन रयत परिषदेचा आक्रोश धरणे आंदोलन संपन्न
बीड : ( सखाराम पोहिकर ) बीड जिल्ह्यातील बहुजन समाजाला सोबत घेऊन आज दि 16 / 3 / 2023 रोज गुरुवार दुपारी 1 = 00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन रयत परिषद च्या वतीने आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व बहुजन समाज बांधवाना मार्ग दर्शन करताना बहुजन रयत परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रमेश तात्या गालफडे यांनी आसे सांगीतले की जो पर्यत मांतग समाजाला त्याचा हक्क मिळत नाही तो पर्यत मी स्वसत बसणार नाही यावेळी तात्या म्हणाले की सन 2010 पर्यत अतिक्रमीत झालेल्या गायरान जमिनीचे पट्टे कास्तकर्यांच्या नावे करण्यात येवून 1 ई च्या रजिस्ट्रला नोंद करण्यात यावी . भूमिहिन शेतमजुराला रुपये 10000 प्रति महिना मानधन देण्यात . यावे अन्न सुरक्षा योजने अंतर्गत बी पी एल कार्ड धारकांना प्रत्येक व्यक्तीला 10 किलो स्वस्त धान्य देण्यात यावे आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे एक ऑगस्तला लोक शाहीर आण्णाभाऊ साठे जयतीनिमित्त शासकिय सुट्टी जाहीर करावी आश्या विविध प्रकारच्या अनेक मागण्या यावेळी रमेश (तात्या ) गालफाडे यांनी यावेळी आपल मत व्यक्त करताना सांगीतले यावेळी प्रमुख उपस्थिती अशोक सोनवणे मराठवाडा संपर्क प्रमुख लालासाहेब शिदे जेष्ठ कार्यकर्ते . गोरख मोमीन जिल्हाध्यक्ष बीड प्रा . रमेश पाटोळे जिल्हा प्रमुख ग्रामीण रविद्र क्षीरसागर तालुका अध्यक्ष बीड सुधाकर कानडे जिल्हा कार्याध्यक्ष बीड संगिता बाबरे तालुका अध्यक्ष महिला आघाडी बीड महेश धुरधरे तालुका अध्यक्ष गेवराई योगीराज साळवे गेवराई तालुका सचिव सुबाबाई थोरात जेष्ठ कार्यकर्त्या गेवराई गणेश कांबळे तालुका अध्यक्ष केज . विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देताना श्री गालफाडे सर म्हणाले की आमच्या मागण्या चा विचार जर शासनाने पंधरा दिवसाच्या आत न केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला