क्राईमजळगावताज्या बातम्या

लेकाला कॉपी पुरविताना बाप पोलिसांच्या हाती लागला, मग.. पुढे काय?


लेकाला कॉपी पुरविताना बाप पोलिसांच्या हाती लागला, मग.. पुढे काय?

एका शाळेत आपल्या मुलाला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पालकाला पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. पोलिसांनी चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

चोपडा तालुक्यातील अडावद गावातील नूतन ज्ञानमंदिर विद्यालय या शाळेच्या आवारातील हा व्हिडीओ आहे. नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या ठिकाणी दहावीचे परीक्षा केंद्र आहे. विद्यालयापासून १०० मीटरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला आपल्या मुलाला एक पालक कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करत होता.

पालक कॉपी पुरवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात घुसला. त्यामुळे याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने संबंधित पालकाला पकडून पोलीस काठीने चांगलाच चोप दिला. चोप देतांना संबंधित पालक जमिनीवर कोसळला. त्याठिकाणी एका बाजूला असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *