ताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहर

केकत पांगरी ग्रामपंचायत निवडणूक प्रकरणातील अज्ञातांना पोलिसांनी छळु नये


केकत पांगरी ग्रामपंचायत निवडणूक प्रकरणातील अज्ञातांना पोलिसांनी छळु नये
जिल्हा भाजपच्या शिष्टमंडळाची एस.पी.कडे मागणी.

बीड :  राज्यातील बंजारा,बहुजन समाजाच्या परिवर्तनवादी चळवळीतील नेते,भटके विमुक्त जाती जमातींच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून अखंडपणे संघर्ष करणाऱे,बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे मा. राष्ट्रीय महासचिव संघर्षशिल नेतृत्व प्रा.पी.टी.चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गेवराई तालुक्यातील रामु नाईक तांडा केकत पांगरी येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या दिवशी १८ डिसेंबर रोजी विरोधकांशी संगनमत करून गेवराई ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार व डीवाएसपी स्वप्निल राठोड यांनी खोटे व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते.
या गुन्ह्यांत मा.औरंगाबाद उच्च न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केला आहे.
परंतु या प्रकरणात पोलिसांनी आपल्या फिर्यादीत इतर २५-३० अज्ञात आरोपींचा समावेश केला आहे. प्रा.पी.टी.चव्हाण यांच्याच घरातील चार पाच होतकरू व लहान सहान व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांची उपजिविका भागवित असलेल्या तरुणांना तुम्हीच मारहाण प्रकरणातील आरोपी आहात,ताबडतोब पोलिसांसमोर हजर व्हावे,अन्यथा पोलिसांचा खाक्या दाखवून देऊ.तुम्हाला अटक करून जेलमध्ये टाकु अशा धमक्या देत गेवराई ठाण्याचे पोलिस कर्मचारी मागील दोन महिन्यांपासून मुद्दामपणे मानसिक छळ करीत आहेत. वास्तविक पाहता मारहाण प्रकरणात या तरुणांचा दुरान्वयानेही संबंध नाही.पोलिसांनी फर्माण सोडल्या मुळे घर दार बायका पोरं व्यवसाय धंदा सोडून हे तरुण अटकेच्या भितीने फरार आहेत. या निष्पाप निर्दोष तरुणांना न्याय द्यावे,त्यांना अटकेपासुन संरक्षण मिळावे,पोलिसांकडून होणारा मानसिक,आर्थिक छळ त्वरित थांबवावा अशी मागणी बीड जिल्हा भाजपचे सक्षम नेतृत्व जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली एका, शिष्टमंडळाने बीडचे पोलिस अधीक्षक मा.नंदकुमारजी ठाकुर साहेब यांच्या कडे २८ फेब्रुवारी रोजी केली आहे.
सोबतच केकत पांगरी ग्रामपंचायत निवडणूकीत कशा प्रकारे स्थानिक विरोधकांनी व तालुका एका राजकीय नेत्यांनी पोलिसांना हाताशी धरून प्रा.पी.टी.चव्हाण यांच्या कुटुंबीयांना व चार निर्दोष तरुणांना जाणिवपूर्वक, अडकवले आहे या संदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. मा.पोलिस अधीक्षक नंदकुमारजी ठाकुर यांनी गेवराई पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. फताडे यांना दुरध्वनी वरुन केकत पांगरी ग्रामपंचायत निवडणूक प्रकरणी सकारात्मक भूमिका घेवुन निर्दोष तरुणांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे व विषयाला अनावश्यक वेगळे वळण न देण्याचे निर्देश भाजपा शिष्टमंडळासमोर दिले आहेत.
यावेळी प्रा.पी.टी.चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांवर कशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले,मतदान करुन रात्री घराकडे जात असलेल्या ५०-६० निष्पाप लोकांना पोलिसांनी कशी अमानुष मारहाण करून गंभीर जखमी केले,या अन्यायकारक व पोलिसांच्या हिटलरशाही प्रवृत्तीच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण करणार्या घटनेकडे मा.पोलिस अधिक्षक साहेबांचे भाजपच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधून घेतले.
सदरील बैठकीत अनेक विषयांवर सविस्तरपणे सकारात्मक चर्चा झाली.यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.देविदास नागरगोजे,भाजपा अनूसुचित मोर्चा जिल्हाध्यक्ष अजय सवाई, भाजपा विमुक्त-भटके आघाडी बीड जिल्हाध्यक्ष डॉ.लक्ष्मण जाधव,भाजपा नेते शांतिनाथ डोरले,नितीन चव्हाण,सुशिल देशमुख,संदिप बेदरे,युवानेते महेश सावंत,चव्हाण संतोष आदी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *