आष्टीत हजरत फत्तेशाह बुखारी यात्रा उत्सवाला सुरूवात, चादर मिरवणूक, कवालीचा कार्यक्रम, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सादिक कुरेशी
आष्टीत हजरत फत्तेशाह बुखारी यात्रा उत्सवाला सुरूवात, चादर मिरवणूक, कवालीचा कार्यक्रम आयोजित
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सादिक कुरेशी
आष्टी। प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे शहरातील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान हजरत फत्तेशाह बुखारी यात्रा उत्सवाला गुरुवार दि.९ फेब्रुवारी पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असुन हा उत्सव तीन दिवस चालणार आहे.अशी माहिती यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष सादिक कुरेशी यांनी दिली.
आष्टी शहरातील प्रसिद्ध असलेले श्रद्धास्थान असणारे देवस्थान हजरत फत्तेशाह बुखारी यात्रा उत्सवाला गुरुवारपासून सुरूवात झाली यामध्ये संदल व छबीनाची सायंकाळी ६ वाजता दर्ग्यापासुन मिरवणूक काढण्यात आली होती. शुक्रवारी यात्रा व चादर मिरवणूकीचा कार्यक्रम होणार तर शनिवारी रात्री ९ वाजता कवालिचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या देवस्थान परिसरात खेळणी,मिठाईचे दुकाने सजली आहेत तर या यात्रा उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष सादिक कुरेशी,देवस्थानचे पुजारी खादीम सय्यद,शब्बीर सय्यद,अँड ताहेर सय्यद,अरूण निकाळजे,तय्यब सय्यद,अजुभाई शेख,सय्यद शफी,बबुभाई अत्तार,जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे, प्रफुल्ल शहस्त्रबुध्दे, उत्तम बोडखे, दत्ता काकडे,अविनाश कदम, जावेद पठाण,शरद रेडेकर,शाकेर कुरेशी,शेरूभाई शेख,नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश शहस्त्रबुध्दे,महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस,नगरसेवक भारत मुरकुटे,जिया बेग, नाजिम शेख, किशोर झरेकर,सुरेश वारंगुळे, शरीफ शेख,अस्लम बेग,इरशान खान,अस्लम बेग, समीर शेख, बाबुराव कदम, बाजीराव वाल्हेकर,हरुण शेख,सलिम कुरेशी,अमिन शेख,जफर कुरेशी,बब्बू शेख,शफी कुरेशी,अयाज कुरेशी,शशिकांत निकाळजे, हाऊसराव वाल्हेकर,रमेश पवळे,निसार सय्यद,वाजेद सय्यद आदींनी केले आहे.
आष्टी शहरातील सर्व जाती धर्मातील युवक व नागरिक यांनी यात्रा उत्सव कमीटी मध्ये सहभागी होऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा असे आवाहन यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष सादिक कुरेशी यांनी केले आहे.