ताज्या बातम्याधार्मिकबीड जिल्हा

जिवन बनवता बनवता आपले स्वतः चे जिवन सुखी बनवा – भाऊसाहेब महाराज पन्हाळकर


जिवन बनवता बनवता आपले स्वतः चे जिवन सुखी बनवा – भाऊसाहेब महाराज पन्हाळकर

बीड प्रतिनिधी – श्री गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या कृपेने व वै. ह. भ. प. सुदामदेव महाराज व वै. ह. भ. प. शांतीब्रम्ह रामहारी महाराज बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने वै. सुदामदेव बाबा यांच्या शताब्दी निमित्त सुरु झालेला सावंतवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सहाव्या दिवसाची किर्तन सेवा ह. भ. प भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांची सुश्राव्य अशी किर्तन सेवा संपन्न झाली.

महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे अभंग सोडवून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले. सार्थक जीवनाचे महत्त्व प्राप्त कसे करायचे, जिवन सार्थक कसे करायचे हे भाविक-भक्तांना अभंगाद्वारे महाराजांनी समजून सांगितले. खरंच महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपली कीर्तन सेवा बंकटस्वामी महाराजांच्या, माऊली दादांच्या भुमी मध्ये संपन्न केली.

*अभंग*

नाम वाचे श्रवण कीर्ति पाउलें चित्तीं समान

काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनीं विठ्ठल

कीर्तनाचा समारंभ निर्दभ सर्वदा

निळा म्हणे स्वरुपसिध्दि नित्य समाधि हरिनामीं

महाराजांनी त्यांच्या गोड वाणीतून भाविक भक्तांना गोड असा संदेश दिला. गोड अश्या अभंगातून भाविक भक्त किर्तन एकूण भारावून गेले. आणि गोड वाणीतून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.

गायनाचार्य – गोरख महाराज वायभट, रोहिदास महाराज शिंदे, मृदंगाचार्य – बंडू महाराज सातपुते, रणजित महाराज शिंदे, हरिदास महाराज खुळे , सिरसाठ महाराज, श्रीकृष्ण महाराज खोसे, त्रिंबक महाराज शेळके, वसंत महाराज शिंदे, साहेबराव महाराज लहाने, तुळशीराम अपा तसेच बंकटस्वामी मठ संस्थान मधील विद्यार्थी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सावंत कलेक्शन चे मालक सावंत आप्पा, राम महाराज गायकवाड, पत्रकार अभिजीत पवार, राजेंद्र म्हस्के , विश्वाससिंग महाराज राजपूतयुवा उद्योजक कृष्णा अंकुशे संजय सावंत, राम महाराज पायाळ, तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच मोठया प्रमाणात ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *