ताज्या बातम्यापुणे

संरक्षण सामग्री प्रदर्शनाला पंधराशे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची भेट


पुणे:निबे लिमिटेड या संरक्षण दलासाठी सामग्री तयार करणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कंपनीने आयोजित केलेल्या ‘एमएसएमई डीफ एक्सपो -2023’ या संरक्षण सामग्री विषयक प्रदर्शनाला पंधराशे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आज भेट दिली.

कंपनीचे संस्थापक गणेश निबे यांनी त्यांना संरक्षण साहित्याची आणि या क्षेत्राची माहिती दिली .यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हेही उपस्थित होते.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटी ,प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनांना येऊन माहिती घेतली .निबे लिमिटेडच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त हे प्रदर्शन सात आणि आठ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते . त्यामध्ये शस्त्रास्त्रे ,रोबो,रॉकेट लॉन्चर,मिसाईल लाँन्चर, ट्रक, मशीन गन,पूल उभारण्याची सामग्री, इलेक्ट्रिक वाहने अशा अनेक गोष्टींचा समावेश होता


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *