पंकजा मुंडेंना वारंवार बदनाम करायचं काम करत आहेत,याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय – चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा एका सभेतला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओत पंकजांना बोलू दिले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र बावनकुळे यांनी व्हिडीओत फेरफार केल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, “पंकजा मुंडेंची बदनामी करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये एक ग्रुप कार्यरत आहे. याला विरोधकांचं पाठबळ आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला. ते बीड मध्ये बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, “मी याआधीही सांगितलं, आजही सांगतोय पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांना माझ्यापूर्वी बोलायचं होतं. अध्यक्षीय भाषण त्यांना करायचं होतं. मात्र मी त्यांना विनंती केली की, आधी मी बोलतो, मग तुम्ही बोला.कारण तुम्ही राष्ट्रीय नेत्या आहात. त्यांनी माझं बोलणं ऐकलं. त्या माईकपर्य़ंत आल्या, त्यांनी माझी विनंती मान्य केली. त्या राष्ट्रीय नेत्या आहेत म्हणून त्यांना सन्मान देत शेवटचं भाषण त्यांनी करायला सांगितलं, असे बावनकुळे म्हणाले.
“काही लोकांनी व्हिडीओत फेरफार केला आहे, याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. पोलिसांनी कारवाई केली. बीड जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षांनी असा एक ग्रुप तयार केलाय, यातून ते पंकजा मुंडेंना वारंवार बदनाम करायचं काम करत आहेत. भाजपचे नेते आले, मी किंवा देवेंद्र फडणवीस आले तर पंकजा यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करायचा त्यांचा प्रयत्न असतो,” असेही बावनकुळे म्हणाले.
“पंकजा यांच्या रक्तारक्तात भाजपा आहे. पंकजांनी परवा माझ्या दौऱ्यामध्ये ज्याप्रमाणे ऊर्जा निर्माण केली. त्यांनी सांगितलं की शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस एक करा, असेही यावेळी बावनकुळे म्हणाले.