खरीप व रब्बी हंगामात खते व बियाणांची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. मात्र अनेकदा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते. यामध्ये शिल्ल्क साठा व प्रत्यक्ष साठाचा ताळमेळ न बसणे. साठा व भावफलक न लावणे. साठा रजिस्टर अद्ययावत नसणे. शेतकऱ्यांना पक्के बिले न देणे. युरिया खताच्या 20 खरेदीदारास विक्री.
नाशिक जिल्ह्यातील नऊ कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षात खते, बियांणामध्ये (Seeds) शेतकऱ्याच्या फसवणुकीचे (Fraud) प्रकार वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा कृषी विभागामार्फत भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याद्वारे मागच्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कारवाई करण्यात आली होती. यानंतर जिल्ह्यातील कळवण, देवळा तालुक्यात भरारी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील कळवण व देवळा तालुक्यातील नऊ कृषी केंद्रांचे परवाने निलंबन केले आहे. जिल्हा भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत या केंद्रात नियमांच उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने निलंबनाची कारवाई करत विक्रेत्यांना कृषी विभागाने दणका दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात रब्बी व खरीप हंगामात खते व बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकांद्वारे आतापर्यंत खते, बी-बियाणे, औषधे अशा असंख्य दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. दुकानातील रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवल्याप्रकरणी दुकानांचा विक्री परवाना निलंबित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ज्या नऊ केंद्रांचे थेट परवाने निलंबन केले, त्या केंद्रात कृषी विभागाने घालून दिलेले नियम पायदंळी तुडवल्याचे दिसून आले. या कारवाइमुळे अनेकांचे धाबे दणानले आहे. जिल्ह्यात काही कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना पक्के बिले न देता त्यांना खते, बियाणे, किटकनाशके यांची विक्री केली जाते. यासंदर्भात कृषी विभागाने वेळोवेळी केंद्र चालकांना आवाहन करत शेतकऱ्यांना पक्के बिले देण्यास सांगितले आहे. तरीही विक्रेते सर्रास त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. जिल्हा भरारी पथकाने धाडी टाकत ज्या केंद्रावर कारवाई केली आहे. तेथे अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे संबंधित दुकानदार विक्रेत्यांकडून शासनासह शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले.