प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणान अक्कल चालवत जुगाड केले,जुगाड चांगलच महागात..
सातारा : साताऱ्यात प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणान अक्कल चालवत जुगाड केले. हे जुगाड करण त्याला चांगलच महागात पडल आहे. मुलं पळवणारी व्यक्ती समजून या प्रियकराची लोकांनी धुलाई केली आहे.
दि. ३० सकाळच्या दरम्यान तामजाईनगर परिसरात ही घटना घडली. पोरं पळवून नेणारी टोळीतील माणूस असल्याच्या संशय मनात धरत स्थानिकांनी ताब्यात चांगलाच चोप दिला. ही बाब सातारा शहरातील शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर संशयीतास त्यांनी ताब्यात घेतले. चौकशीत गडी लव्हरला भेटायला बुरख्याच्या वेशात गेल्याचे समोर आले.
सातारा शहरातील तामजाईनगर परिसर हा वर्दळीचा आहे. या परिसरात शाळा असल्याने लहान मोठी मुले शाळेत जात होती. याचदरम्यान एक बुरखाधारी व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत होता. बुरखा घातलेली महिला ती पुरुषासारखी चालत असल्याचे काही महिलांनी लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला घेरण्यात आले.
दरम्यान हा व्यक्ती एका इमारत परिसरात बराचवेळ रेंगाळत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांच्या मनात पाल चुकचुकली. पोरांची शाळा परिसरात असल्याने अखेर काही नागरिकांनी बुरखाधारी व्यक्तीला थेट जवळ जात धरले. तोपर्यंत याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना देण्यात आली.
आपण घेरलो गेल्याचे बुरखाधारीच्या लक्षात येताच त्याने पळायचा प्रयत्न केला आणि ‘बुरखा फाटला !’ बुरख्यात पुरुष असल्याचे पाहून जमाव संतप्त बनला व त्याला तुडवायला सुरुवात केली. या घटनेने परिसरात बघ्यांची गर्दी झाली. यावेळी स्थानिकांनी त्याला काही विचारल्यावर त्यांची भंबेरी उडाल्याने त्याला काही बोलावे सूचत नव्हते. दरम्यान हा पुरूष बोलत नसल्याने जमावाने त्याला चांगलाच चोप दिला. यादरम्यान शाहूपुरी पोलिस ठाण्याची फौज घटनास्थळी दाखल झाली.
कशाला आला होता व बुरख्याची भानगड विचारताच तो बोलता झाला. बुरखाधार्याने दिलेले उत्तर ऐकूण पोलिसांनी कपाळावर हात मारला. घटनास्थळी अब्रूचे खोबरे होवू नये यासाठी बुरखाधार्यानेच मला पोलिस ठाण्यात घेवून चला, असा पाढा लावला.
पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेवून सायंकाळपर्यंत त्याचा बायोडाटा काढत कुंडली काढली. मी लव्हरला भेटायला आलो होतो म्हणून बुरखा घातल्याचे त्याने सांगितले.