रामायणातील रावणाबद्दल व त्याच्या जीवनशैलीबद्दल सगळ्यांनाच जाणुन घ्यायची उत्सुक्ता असते. चला तर मग बघुया कुठे आहे रावणाची सासुरवाडी. आणि काय आहे तिथले रिती रिवाज
मंदसौर : आज देशभरात दुष्टाईचे प्रतीक असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात आहे, पण एक अशी जागा आहे जिथे रावणाचा पुतळा जाळला जात नाही तर रावणाच्या पुतळ्याची पूजा केली जाते. कारण इथे रावण हा या गावाचा जावई Dashanan Ravana mother in law Place असल्याचे मानले जाते. रावणाची पत्नी मंदोदरी Ravanas wife Mandodari या गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.Dussehra 2022
मंदसौरच्या खानपुरा Khanpura in Mandsaur is Ravana mother in law गावात दसऱ्याच्या दिवशी लोक हातात आरतीचे ताट घेऊन नाचतात आणि गातात, ढोल वाजवतात, दरवर्षी मिरवणूक काढतात. हे लोक दसऱ्याच्या सणाला रामाच्या झांकीमध्ये रावणाच्या पुतळ्याचे दहन करायला जात नाहीत, तर त्यांच्या जावई राजाची म्हणजेच रावणाची पूजा करायला जातात. रावण हा जगाच्या नजरेत दुष्टाचे प्रतिक असेल, पण त्यांच्या नजरेत तो जावई बापू आहे.
300 वर्ष जुनी परंपरा : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील खानपुरा गावात लंकापती रावणाचा मोठा पुतळा आहे. येथे रावणाची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी लोक येथे रावणाची पूजा आणि आरती करण्यासाठी येतात. मंदसौरमधील नामदेव समाज 300 वर्षांहून अधिक वर्षांपासून दशानन रावणाची पूजा करत आहे. रावणाची पूजा करण्यामागे अशीही धारणा आहे की, रावण अहंकारी होता, तर काय झाले, तो मोठा विद्वानही होता.
नामदेव समाजाची कन्या : वास्तविक नामदेव समाज रावणाची पत्नी मंदोदरी हिला आपली कन्या मानतात. यामुळे ते रावणाला आपला जावई मानतात आणि त्याची पूजा करतात. येथे स्त्रिया दशानन रावणाला जावई मानून डोक्यावर पदर घेतात, त्या पदर बाजुला सारुन कधीच रावणाच्या पुतळ्यासमोरून जात नाहीत.
एक विश्वास देखील : रावणाबद्दल अशीही एक समजूत आहे की, येथे रावणाच्या पायावर संरक्षक धागा बांधल्याने ताप (जो एक दिवसानंतर येतो) बरा होतो. त्यामुळे येथे लोक येऊन रावणाच्या पायाला लाल धागा बांधतात.